BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० जाने, २०२२

भिकारी समजून महिलेने दिले होते अभिनेते रजनीकांत यांना दहा रुपये !

 






माणूस कितीही मोठा असला आणि लोकप्रिय असला तरी कधी वयाच्या वाट्याला काय येईल हे काही सांगता येत नाही हेच खरं ! महानायक अमिताभ बच्चन, रुपेरी पडद्यावरील सुपरस्टार रजनीकांत अशा बड्या अभिनेत्यांना ओळखणार नाही असा माणूस शोधून तरी सापडेल काय ?  त्यात रजनीकांत यांच्यासारखा कलावंत म्हटल्यावर तर विषयच उरत नाही.  अशा अभिनेत्याची एक झलक पाहायला मिळावी म्हणून चाहते काय नाही ते करतात.  यांची लोकप्रियता एवढ्या शिखरावर पोहोचलेली असते की लोक त्यांची मंदिरे बांधतात आणि त्यांची पूजाही करतात. चाहत्यांच्या काळजाचा ताबा या कलावंतानी घेतलेला असतो आणि ते कायम त्यांच्या हृदयात राहार असतात.  विदेशातही यांची क्रेझ असते मग आपल्याच देशात यांना न ओळखणारा कुणी भेटेल ? नाही असच उत्तर असलं तरी रजनीकांत यांना न ओळखणारी एक महिला याच देशात आहे. या महिलेने या सुपरस्टारला ओळखले तर नाहीच पण भिकारी समजून रजनीकांत यांना दहा रुपयांची भीक या महिलेने दिली होती. 


होय, हा काही चित्रपटातील प्रसंग नाही की एप्रिल फूल सारखा विषय नाही . एका मंदिरात घडलेला हा खराखुरा किस्सा आहे. दक्षिणेतला प्रचंड लोकप्रियता मिळवलेला हा महाराष्टीयन अभिनेता. लाखो करोडो चाहते असलेला कलावंत. त्याची एक झलक पाहायला सगळेच उतावीळ असतात. हा अभिनेता कोट्यावधी मालमत्तेचा मालक आहे. टोलेजंग बंगल्यापासून अनेक अलिशान गाड्यापर्यंत सगळं काही त्याच्याजवळ आहे. अशा धनाढ्य अभिनेत्याला एका महिलेने चक्क भिकारी समजून त्याच्या हातावर दहा रुपयाची नोट टेकवली होती.  खरं तर हे सत्य वाटण्यासारखं नाही. पण हा किस्सा घडला होता. आणि विशेष म्हणजे त्या महिलेने दिलेली दहा रुपयांची भीक रजनीकांत यांनी स्वीकारलीही होती. 


पंधरा सोळा वर्षांपूर्वीची ही घटना आहे. त्यावेळी रजनीकांत यांचा 'शिवाजी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यांच्या या चित्रपटानं अफाट यश मिळवलं होतं. एकेक विक्रम या चित्रपटाने केले होते. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने भरभक्कम कमाई केली होती. चित्रपटाचं यश पाहून रजनीकांत आपल्या काही मित्रांसह मंदिरात देवाच्या दर्शनासाठी गेला होता. रजनीकांतसारख्या यशस्वी नटला खुल्या जगात सहजासहजी कसं बरं फिरता येईल. तो दिसेल तेथे प्रचंड गर्दी उसळणार आणि मग अनेक समस्या उभ्या राहणार. मंदिरात तर जायचं होतं पण तेथे गेल्यावर निर्माण होणारी परिस्थिती त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होती. रजनीकांत आल्याची बातमी लागली तर अवघं शहर या मंदिरात उसळणार होतं. अखेर रजनीकांत यांनी आपली ओळख लपविण्यासाठी एक युक्ती केली. एका वृद्ध व्यक्तीचा गेटअप त्यांनी केला. कपडे, दाढी असं सगळं काही बदलत त्यांनी कुणीही ओळखणार नाही असे रूप बदलून घेतले. मंदिरात आलेल्या एका सामान्य वयस्कर व्यक्तीकडे कुणाचं आणि कशासाठी लक्ष जाईल. 

  

आपलं सर्व मूळ रूप बदलून रजनीकांत मंदिरात गेले. मंदिराच्या पायऱ्या चढताना त्यांच्या समोरून एक महिला आली आणि तिने रजनीकांत यांच्या हातावर थेट दहा रुपयांची एक नोट ठेवली. वयस्कर व्यक्तीला उपयोगाला येतील म्हणून या महिलेने त्यांना भीक दिली. महिलेने भीक म्हणून दिलेली ती नोट रजनीकांत यांनी स्वीकारलीही ! ती नोट घेऊन रजनीकांत तसेच पुढे गेले. मंदिरात गेल्यावर रजनीकांत यांनी आपल्या पाकिटात असलेले सगळे पैसे काढले आणि देवाच्या पायावर ठेवले. हा सर्व प्रकार ती महिला जवळून पाहत होती. त्यानंतर मात्र या महिलेने निरखून पहिले आणि मग तिच्या लक्षात आले. साक्षात रजनीकांत यांनाच आपण भिकारी समजून भीक दिल्याचे लक्षात आल्यावर ती खजील झाली. महिलेने पुढे होत रजनीकांत यांची माफी मागितली आणि ती दहा रुपयांची नोट परत देण्याची विनंती केली. 


सदरची नोट आपण देवाच्या चरणी अर्पण केली आहे, तुम्ही मला केवळ आशीर्वाद द्या असे रजनीकांत या महिलेला म्हणाले आणि तेथून निघून गेले. नंतर हा किस्सा ज्याला त्याला समजला. खूप चर्चा तर झालीच पण रजनीकांत यांनी जो विनय, नम्रता दाखवली त्यामुळे रजनीकांत लोकांच्या मनात अधिकच घट्ट घर करून बसले.   


हे देखील वाचा :>>



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !