BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ ऑग, २०२२

तुला खल्लास करतो ! वकिलाला धमकी देणारा अडचणीत !

 



शोध न्यूज : 'बाहेर चल, तुला खल्लासच करतो " अशी कोर्टाच्या आवारातच वकिलाला धमकी देणाऱ्या पाटलाच्या विरोधात माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वकिलाशी पंगा घेणे महागात पडले आहे. 


माढा न्यायालयाच्या नवीन इमारतीतील पॅसेजमध्ये वकील ऍड प्रशांत पाटील याना मोठी धमकी देण्याची घटना घडल्याची बाब माढा पोलीस ठाण्यापर्यंत गेली होती. वकील प्रशांत पाटील हे न्यायालयात आपल्या कामकाजाच्या निमित्ताने माढा येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीत गेले होते. ते पॅसेजमधून (Madha Court) जात असताना माढा तालुक्यातील बावी येथील यशवंत बाळासाहेब पाटील यांनी त्यांना धमकी दिल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. ऍड. प्रशांत पाटील यांच्या फिर्यादीनुसार ते न्यायालयीन कामासाठी न्यायालयात निघालेले असताना यशवंत पाटील यांनी त्यांना धमकावले. 'तू कुठे चाललास? कोर्टात जायचे नाही' असे म्हणत ऍड पाटील यांची कॉलर पकडली, 'माढा न्यायालयात तू केसेस चालवायच्या नाहीत, तू बाहेर चल, तुला बघतोच' असे म्हणत त्यांना न्यायालयात जाण्यापासून रोखले आणि बाहेर ओढत नेण्याचा प्रयत्न केला. 


न्यायालयाच्या आवारातच ही ओढाओढी सुरु असताना ऍड पाटील यांनी 'असे करू नका" असे सांगितले असता, "तुला सोडत नाही, यापुढे तू वकिली कशी करतो हेच बघतो, तू बाहेर चल, आता तुला खल्लासच करतो" असे म्हणत अंगाला झटून 'तुला आता जिवंत सोडली, यापुढे दिसला तर जिवंत सोडणार नाही"  अशी धमकी दिली आणि कोर्टाच्या कामासाठी जाण्यापासून रोखले अशा प्रकारची फिर्याद ऍड पाटील यांनी पोलिसात दिली. (Lawyer threatened in court premises)  त्यानुसार यशवंत बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


 न्यायालयाच्या आवारात हा सगळा प्रकार घडल्याने काही काळ न्यायालय परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. वकील आणि पक्षकार देखील या पॅसेजकडे धावले होते. न्यायालयाच्या आवारात अशी घटना घडल्याने तालुकाभर चर्चा सुरु झाली आहे. 

    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !