BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ डिसें, २०२१

दहावी - बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर !

 


मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. 


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून शाळांचे दरवाजे बंद राहिले आणि परीक्षेचेही काय होणार हा मोठा प्रश्न विद्यार्थी आणि पालक यांच्यासमोर होता परंतु आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या दरम्यात तर दहावीची लेखी परीक्षा  १५ मार्च ते १८ एप्रिल या दरम्यान घेतली जाणार आहे .   


सर्व संबंधित घटकांशी आणि  शिक्षण तज्ञांशी विचार विनिमय करून सदर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, कोरोनामुळे अभ्यासक्रमात यापूर्वीच २५ टक्के कपात करण्यात आलेली आहे त्यामुळे उर्वरित अभ्यासक्रमावरच परीक्षा होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच सर्व परीक्षा घेतली जाईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. सदर परीक्षा प्रचलित ऑफलाईन पद्धतीने होणार असून प्रात्यक्षिक. श्रेणी व तोंडी अंतर्गत गुणांची परीक्षाही प्रचलित पद्धतीने घेतली जाणार आहे. दहावी परीक्षेचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत घोषित करण्याचा प्रयत्न असेल अशी माहितीही गायकवाड यांनी दिली आहे. 


---------------

 हे देखील वाचा >>>> 

-------------------



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !