BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ डिसें, २०२१

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे सक्तीचे नाही पण ---



जालना : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याचा विषय हा ऐच्छिक असून तो सक्तीचा नाही असा खुलासा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच केला आहे. आरोग्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणामुळे लसीला विरोध करणाऱ्यांना बळकटीच मिळणार आहे. 

जवळपास एक वर्षांपूर्वी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु झाले पण अद्याप लसीचा एकही डोस न घेतलेल्यांची संख्या मोठी आहे. कोरोनाचा आक्रमक प्रभाव होता तेंव्हा लस घेण्यासाठी रांगा लागत होत्या आणि लस उपलब्ध होत नव्हती. आता मुबलक लस असताना नागरिक लसीकरणाकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. कोरोना परतीच्या प्रवासाला निघाल्याने नागरिक लस घेण्यास टाळताना दिसत होते पण पुन्हा ओमीक्रोन विषाणूचे रुग्ण वाढू लागल्याने लसीकरण केंद्राकडे नागरिकांचे पाय वाळू लागले आहेत. असे असले तरी अनेक जिल्हात जिल्हाधिकारी यांनी लसीकरण सक्तीचे केले असून लस न घेणाऱ्यावर कडक निर्बंध लावण्यात येत आहेत. या सक्तीला विरोध होत असून जिल्हाधिकारी यांचे आदेश बेकायदा असल्याचे सांगत काहींनी न्यायालयाची दारेही ठोठावली आहेत. अशा वातावरणात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच लस सक्तीची नसल्याचे सांगितले आहे. 


कोरोना प्रतिबंधाची लस घेण्यासाठी प्रशासन सक्ती करीत असल्याबाबत एका शिक्षकाने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारले असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. लसीकरणाचा विषय हा ऐच्छिक आहे, सक्तीचा नाही पण ठिकठिकाणी जिल्हाधिकारी याची सक्ती करीत आहेत. सक्ती करण्याचा जिल्हाधिकारी यांचा हेतू चांगला असून त्या हेतूबाबत शंका नाही. लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग करीत आहे. राज्यात दररोज ८ लाख नागरिकांचे लसीकरण होत असून लस न घेतलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.     

'ओमीक्रॉन' चा धोका !


कोरोना परतीच्या मार्गाला लागला असे वाटत असतानाच 'ओमीक्रॉन' ने चिंता वाढवली आहे आणि पुन्हा तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु झाली आहे. राज्यात रोज नव्या ठिकाणी 'ओमीक्रॉन'चे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. यासंदर्भात भाष्य करताना आरोग्यमंत्र्यांनी सावधगिरीचे आवाहन केले आहे. 'राज्यात 'ओमीक्रॉन'चे रुग्ण वाढत असतील तर याचा परिणाम फेब्रुवारी महिन्यात पाहायला मिळू शकतो असा अंदाज टास्क फोर्सने व्यक्त केला आहे' अशी माहिती टोपे यांनी दिली आहे. बुलढाणा, उस्मानाबाद येथेही 'ओमीक्रॉन'चे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील 'ओमीक्रॉन' रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

निर्बंध नाहीत ! 


'ओमीक्रॉन' मुळे शासन आणि प्रशासन अधिक सतर्क झाले असल्याने पुन्हा निर्बंध लादले जातात की काय अशी भीती नागरिकांना वाटत आहे पण लगेच कुठले निर्बंध लावले जाणार नाहीत असे टोपे यांनी स्पष्ट केले आहे. नूतन वर्ष, ख्रिसमस, ३१ डिसेंबरच्या पार्ट्या यावर कोणतेही निर्बंध लावण्यात येणार नाहीत परंतु लसीकरणही वाढवावे लागेल आणि नागरिकांनी कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळावेत आणि गर्दीही टाळावी असे आवाहन टोपे यांनी केले आहे.  

---------------

 हे देखील वाचा >>>> 


 पहिल्यांदाच ...! सख्खे भाऊ आणि चौघेही आमदार !


भाजप नेता दोन कोटींचा मालक 'मजूर' !


पहिल्यांदाच ...! सख्खे भाऊ आणि चौघेही आमदार !

-------------------


चाचण्यांचे दर कमी !


खाजगी प्रयोगशाळेचे आरटीपीसीआर चाचण्यांचे दर कमी करण्यात आले आहेत. रेल्वे स्टेशन, विमानतळ अशा ठिकाणी अतिशीघ्र चाचणीसाठी आधी ४ हजार ५०० रुपये दर आकाराला जात होता तो आता १ हजार ९७५ एवढा करण्यात आला आहे, ठरमोफिशरचा दर देखील १ हजार ९७५ एवढाच ठेवण्यात आला असून टाटाचा दर ९७९ रुपये करण्यात आला आहे. पीपीई कीट उपलब्ध झाल्यास भविष्यात हे दर आणखी कमी करण्यात येतील असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !