BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ डिसें, २०२१

नव्या वर्षात 'ओमीक्रॉन' महाराष्ट्रात सर्वत्र पसरणार !



मुंबई : 'ओमीक्रॉन' व्हेरिएंटने जगभर चिंता निर्माण केलेली असतानाच महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढत असून जानेवारी महिन्यात 'ओमीक्रॉन'  राज्यभर पसरण्याची भेटी तज्ज्ञांनी व्यक्त केली असल्याने राज्यात वेळीच दक्षता घेण्याचे परिस्थिती निर्माण झाली आहे. 


कोरोनाचा प्रादुर्भाव संपत आल्याने दिलासादायक वातावरण निर्माण होऊ लागले होते परंतु पुन्हा 'ओमीक्रॉन' व्हेरिएंटने झोप उडवायला सुरुवात केली आहे. भारत आणि भारताबाहेरही या नव्या विषाणूचा धसका घेतला गेला असून 'ओमीक्रॉन' ची व्याप्ती वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठा विनाश केला असल्यामुळे 'ओमीक्रॉन' ची दहशत जनमानसावर आहे. शासन आणि प्रशासन अत्यंत दक्ष असून 'ओमीक्रॉन' वर बारकाईने नजर ठेऊन आहे. देशभरात जरी 'ओमीक्रॉन' चे रुग्ण आढळून येत असले तरी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत त्यामुळे महाराष्टाला तर अधिक सतर्क असण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातच तज्ज्ञांनी पुढच्या महिन्यातील धोका स्पष्ट केला आहे. 


नव्या वर्षात म्हणजेच पुढील जानेवारी महिन्यात महाराष्ट्र राज्यात 'ओमीक्रॉन' ची प्रकरणे मोठ्या प्रमाणात आढळून येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे जानेवारी महिन्यात आढळून येणारे रुग्ण हे केवळ मोठ्या शहरातील नव्हे तर लहान शहरातही असतील असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.   त्यामुळे महाराष्ट्र राज्याला अधिक सतर्क व्हावे लागत आहे. नागरिकांनीही कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले जात आहे.  नागरिकांनी वेळीच सतर्कता बाळगली नाही तर पुन्हा अधिक कठोर निर्बंधाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 


महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण 

'ओमीक्रॉन' ने देशात आणि देशाबाहेरही आक्रमण केले आहे पण देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याची बाब समोर आलेली  आहे.  भारतात आत्तापर्यंत 'ओमीक्रॉन' चे ७३ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ३२ रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या अहवालानुसार महाराष्ट्रात आढळलेल्या चार नव्या संसर्गापैकी दोन रुग्ण उस्मानाबाद येथील तर मुंबई आणि बुलढाणा येथील प्रत्येकी एक आहे. सदर रुग्णांपैकी तीन रुग्णाचे लसीकरण करण्यात आले आहे.  या रुग्णात १६ ते ६७ वयोगटातील एक महिला आणि तीन पुरुष रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सर्व रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. 


उस्मानाबाद येथे आढळेला रुग्ण हा  शारजा येथून आलेला आहे तर दुसरा रुग्ण त्याच्याच संपर्कात आलेला आहे. बुलढाणा येथे आढळलेला रुग्ण हा दुबई येथून परतलेला आहे तर दुसरा रुग्ण आयर्लंड येथून परत आलेला आहे.  हे चारही रुग्ण रुग्णालयात असून त्यांचे अलगीकरण करण्यात आलेले आहे. 

---------------

 हे देखील वाचा >>>> 

-------------------

महाराष्ट्र राज्यात अधिक रुग्ण आढळले असल्याने राज्याला चिंता करावीच लागणार आहे पण त्यासोबत नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.  राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्वत्र लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे आणि शंभर टक्के लसीकरण करण्याचा शासन आणि प्रशासन यांचा प्रयत्न आहे . कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळण्याचे आवाहन सातत्याने केले जात असून अजूनही असंख्य लोकांनी कोरोनाला गंभीरपणे घेतले नसल्याचेच चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाला निर्बंध कडक करावे लागत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेले अपरिमित नुकसान विचारात घेऊन तरी नागरिकांनी वेळीच सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे. काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे हेच या परिस्थितीत हितावह ठरणार आहे.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !