BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ जून, २०२२

पंढरपूर - शेटफळ रस्त्यावरून पळवलेला ट्रक २४ तासात पकडला !

 



मोहोळ : पंढरपूर - शेटफळ रस्त्यावर चालकाला बांधून आणि बंदुकीचा धाक दाखवून मालासह पळवलेला ट्रक पोलिसांनी  अवघ्या २४ तासात पकडला असून मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. 


पंढरपूर - शेटफळ दरम्यान आष्टी शिवारात ट्रक चालकाला बांधून उसाच्या पिकात टाकून मारहाण केली आणि बंदुक, तलवारीचा धाक दाखवून १२ टन वजनाच्या सळईसह ट्रक पळवून नेण्याचा थरार कालच घडला होता. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला होता. ट्रकचालक प्रवीण सरगर (नाझरे, ता. सांगोला) हे जालना येथून स्टील घेवून सांगलीकडे निघाले होते. लघुशंकेसाठी ते ट्रक थांबवून खाली उतरले तेवढात एका इंडिका गाडीतून सहा जण उतरले आणि त्यांनी प्रवीण सरगर यांचे हातपाय बांधून त्यांना उसाच्या पिकात टाकले. त्यांच्या डोक्याला बंदूक लावून आणि तलवारीचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील २० हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली तसेच १२ टन वजनाच्या स्टीलसह मालट्रक पळवून नेला होता.  


ट्रकचालक सरगर यांनी याबाबत मोहोळ  पोलिसात तक्रार दिली आणि पोलीस तातडीने या तपासाला लागले. ट्रक आणि आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली आणि लगेच तपास सुरु केला. पोलिसांची ही पथके भूम, परंडा, तेरखेडा, वाशी आदी ठिकाणी फिरून अंदाज घेत होती. दरम्यान परंडा तालुक्यातील येणेगाव शिवारात हा ट्रक असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली. पोलिसांनी लगेच आपला मोर्चा तिकडे वळवला आणि त्या ठिकाणी त्यांना सदर ट्रक आढळून आला. (Mohol police found the hijacked truck) ट्रकमधील स्टील देखील तसेच होते. 


चोवीस तासात छडा !
मोहोळ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या ट्रकच्या चोरीचा छडा लावला आणि मुद्देमालासह ट्रक ताब्यात घेण्यात त्यांना यश आले. १३ लाख ६१ हजाराच्या चोरीतील १३ लाख १० हजाराचा माल पोलिसांनी हस्तगत करून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. 


उडाली होती खळबळ !
चालकाला बांधून आणि बंदूक तलवारीच्या धाकावर मालासह ट्रक पळवून  नेण्याच्या या घटनेचा अनेकांना धक्का बसला होता. भर रस्त्यावरून एवढी मोठी चोरी करण्याचे धाडस केले जात असल्याने रात्री अपरात्री वाहनातून प्रवास करण्याची देखील आता भीती व्यक्त होत आहे. पोलिसांनी या चोरीचा छडा अवघ्या २४ तासात लावल्याने मोहोळ पोलिसांचे कौतुक होत आहे.   


हे जरूर वाचा : >>

(खालील बातमीला टच करा )




अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा ! 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !