BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ सप्टें, २०२३

पंढरीच्या या 'सर्किट' कथित भावी नगरसेवकाला कुणीतरी आवरा रे !

 


शोध न्यूज : नगरपालिका निवडणुका जशा लांबल्या आहेत तसे अनेकजण अस्वस्थ आहेत, पाच वर्षे कष्ट करून नगरसेवक पदाची अपेक्षा ठेवणे गैरही नाही, पण एक लाळगाळया केवळ 'मालका'चे नाव घेत, नगरसेवक झाल्याच्या थाटात वागताना दिसत असून त्याची लाळ ओसंडून वाहू लागली आहे याची  चर्चा गेल्या काही दिवसापासून पंढरीत सुरु आहे. 


नगरसेवक व्हावे वाटणे यात काही गैर नाही, अनेकजण हे पद मिळविण्यासाठी वर्षानुवर्षे जनतेत खपलेले असतात, लोकांसाठी झिजत राहतात आणि दिवसरात्र परीश्रम घ्यावे लागतात ....लोकही त्यांना भरघोस मतदान करतात. पण पंढरीतला एक भुरटा छाप, जनतेशी कसलाही संबध नसताना, आणि गल्लीतले कुत्रेही ओळखत नसताना, नगरसेवक होण्याची स्वप्ने पाहतोय. केवळ 'मालका'चे नाव घेतले की, आपण नगरसेवक होतो असा गैरसमज असलेल्या एका किराणा दुकानदाराची मोठी चर्चा पंढरीत सुरु आहे.  गेल्या काही काळापासून भावी नगरसेवक म्हणून मिरवत आहे.  भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे  पंढरीत आल्या असताना देखील हा 'कथित' आणि स्वयंघोषित  भावी नगरसेवक लाळ सांडेपर्यंत पुढे पुढे करीत होता. गर्दीत पुढे जाण्याच्या नादात एकाने याला लाथ मारली, तरी देखील त्याला ती गोड लागली असावी, असे त्याच्या अविर्भावातून दिसत होते. सारे काही केवळ नगरसेवक होण्याचे स्वप्नं साकार करण्यासाठीच ना ? असे कुठे होते काय ?


पंढरपूर नगरपालिकेत नगरसेवक होण्यासाठी त्याने सांडलेली लाळ भादुले चौकापासून पुढे लांबपर्यंत गेलेली आहे. लोकांना वाटते, पाऊस पडला की काय ? हे पाणी कुठले ? पाणी नव्हे हो, ही तर तोंडातून टपकलेली लाळ ........ 


  नगरपालिकेच्या निवडणुका लांबल्या आहेत त्यामुळे हा कथित भावी नगरसेवक  अस्वस्थ झाला असून, 'मालकां'कडे आपली शिफारस करावी  यासाठी तो अनेकांना भेटत असतो आणि फोन देखील करीत असतो. या फोनवर तो 'मालकां' बाबत काय बोलतो, याच्या ऑडीओ क्लिप देखील काही पत्रकारांनी सांभाळून ठेवल्या आहेत. 'काही करा, आणि मालकांना आपल्या उमेदवारीबाबत पटवून द्या' असा आग्रह देखील तो करतो. याचे किराणा दुकान आधीच बदनाम झाले आहे, शिवाय याच्या खोट्या कारनाम्याला आणि दिखाऊ पणाला लोक वैतागले आहेत. तरी देखील याला नगरसेवकाचे स्वप्न पडू लागले असून, गेल्या काही महिन्यांपासून शहरात याची खिल्ली उडवली जात आहे. 


त्याच्या दुकानात ग्राहकांची कशी फसवणूक होते याबाबत देखील सुरस चर्चा सुरु असते, शहरातील व्यापारी देखील याला 'सर्किट' म्हणून ओळखतात. तोंडावर आणि सोशल मीडियावर याला अनेकजण 'भावी नगरसेवक' म्हणून हरभऱ्याच्या झाडावर चढवतात.... सोशल मीडियावर याचे 'भावी नगरसेवक' म्हणून अभिनंदन करतात आणि खी खी हसतात ....लायकी नसलेला हा, त्या हरभऱ्याच्या झाडावर चढतो आणि रात्रभर, आपण नगरपालिकेत असल्याचे स्वप्न पाहतो.  दिवसाही हा नगरसेवकाच्या थाटातच वावरत आहे, त्यामुळे 'याला कुणीतरी आवर रे !' असे देखील काही व्यापारी आणि नागरिक म्हणू लागले आहेत.


मालकांनी मंजूर करून घेतलेल्या कामांची झेरॉक्स कॉपी घेऊन येतो आणि नागरिकांना दाखवत, स्वतःचा ढोल वाजवतो ... साहेबाजवळ बसून आपणच हे काम मंजूर करून आणल्याचे सांगतो ... 'ये पब्लिक है, सब कुछ जानती है ....' पण याला वाटते, गंडवागंडवी आपल्यालाच जमते ... लोक मात्र टिंगल करीत हसत राहतात...!


दुकानदार म्हटलं की , बिच्चारा इमाने इतबारे कष्ट करतो, आपला विकास कसा होईल, आपले दुकान कसे लोकप्रिय होईल आणि ग्राहकांचा विश्वास कसा संपादन करता येईल एवढेच पाहतो. (Pandharpur circuit future corporator, discussion among citizens)  या स्वयंघोषित भावी नगरसेवकाला दुकान कसेही चालू द्या, ग्राहक काहीही म्हणू द्या, पण लोकांनी आपल्याला नगरसेवक म्हटले पाहिजे एवढेच हवे आहे. अरे बाबा, नगरसेवक असे कुठे स्वतःच्या चिपळ्या वाजवून होता येते का ? सोशल मीडियावर आपल्या हाताने आपलाच ढोल वाजवून कोण नगरसेवक होते का ?  ज्या मालकांच्या नावाने मालकांचा नव्हे तर, स्वत:चा ढोल वाजवतो, त्या मालकांनी केवढे परिश्रम केलेत. याची तरी जरा आकडेमोड कर' असे काही जण खाजगीत बोलत आहेत. याची ऑडीओ क्लिप व्हायरल होईल तेंव्हा मात्र हा घाम पुसत राहील. आणि लवकरच ते देखील लोकांसमोर येईल. कुठे महात्मा 'गांधी' आणि कुठे हा आपलीच आरती ओवाळून घेण्यात धन्यता मानणारा डुप्लीकेट ........  लाथा हाणा, पण नगरसेवक म्हणा ----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !