BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ ऑग, २०२२

पंढरपूर तालुक्यात गणेश मूर्तींचे मोफत वाटप !

 


शोध न्यूज : गणेशोत्सव सुरु होताच अत्यंत उत्साहात गणेशाचे स्वागत करण्यात आले असून पंढरपूर तालुक्यातील खेड भोसे येथे श्री गणेश मूर्तींचे मोफत वाटप करण्यात आले. 


मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुरु झाला असून सार्वजनिक गणपती मंडळाच्या मंडपात गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे तसे घरोघरी देखील श्रीगणेश विराजमान झाले आहेत. गणेश भक्तांनी आपल्या आवडीप्रमाणे गणेश मूर्ती आणलेल्या असून काही सामाजिक संस्था, मंडळे यांनी आज गणेशमूर्तींचे मोफत वाटप देखील केले आहे. पंढरपूर तालुक्यातील खेड भोसे येथे विठ्ठल शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बबनदादा शिंदे यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त गणेश मूर्ती मोफत वाटप करण्यात आले.  (Free distribution of Ganesha idols in Pandharpur taluka) खेड भोसे येथील पांडुरंग पवार मित्रपरिवार  यांच्या वतीने गणपती बाप्पांचे मोफत वाटप करण्यात आले.  


खेड भोसे विविध कार्यकारी सहकरी संस्थेचे  बाबुराव पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तू आप्पाराव पवार, माजी सरपंच दिलीप नामदेव पवार यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले. यावेळी खेड भोसे गावातील ग्रामस्थ व पांडुरंग पांडुरंग मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी माझे सरपंच सिद्धेश्वर पवार माजी सरपंच सुरेश नाना पवार, माजी सरपंच सिद्धेश्वर पाटील उपसरपंच बंडू पवार, विकास पवार, राजकुमार जमदाडे, पांडुरंग पवार, बबन पवार, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना ठेकेदार बबन पवार, सिद्धी सिद्धेश्वर पवार, राजकुमार जमदाडे, गणेश जमदाडे, बापू पाटील, शिवम पैलवान, शिवाजी पवार, सत्यवान जाधव, संजय भोसले, कृष्ष्णा  बेलकर, गणेश पाटील, आप्पा पाटील, सिद्धेश्वर पाटील, शिवाजी लोंढे उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !