BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ जून, २०२२

शेतकरी संघटनेत फुट, हकालपट्टीची घोषणा !

 



पंढरपूर : बळीराजा शेतकरी संघटनेत मोठी फुट पडली असून काही पदाधिकारी यांची हकालपट्टी केल्याची  घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून संघटनेत धुसफूस सुरु होती.

 
संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील आणि बी. जी. पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून बळीराजा शेतकरी संघटनेची स्थापना केली होती. आठ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या संघटनेपुढे अनेक आव्हाने असताना अंतर्गत काही कुरबुरी सुरु झाल्या होत्या. पंढरपूर येथील नितीन बागल यांनी मागच्याच आठवड्यात बळीराजा शेतकरी संघटनेशी पंजाबराव पाटील आणि  बी जी पाटील यांचा  काही संबंध नसल्याचे सांगितले होते आणि त्याबरोबरच आपण बळीराजा शेतकरी संघटनेची अधिकृत नोंदणी केली असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. नितीन बागल यांनी संघटनेतील काही पदाधिकारी यांना बरोबर घेवून बळीराजा शेतकरी संघटना या नव्या संघटनेची स्थापना केली आहे.

 
बागल आणि पाटील हे दोघेही बळीराजा ही शेतकरी संघटना आपलीच असल्याचे सांगत असल्याने नवा पेच निर्माण झाल्यासारखे दिसत असून पंजाबराव पाटील आणि बी जी पाटील यांनी पंढरीत येवून ही संघटना आमचीच आहे असे सांगत फुटीर पदाधिकारी यांची संघटनेतून हकालपट्टी केली असल्याची घोषणा केली आहे. एकूण या संघटनेतील वाद उफाळून आला असून आता तो चव्हाट्यावर येऊ लागला आहे. (Baliraja Shetkari Sanghatana dispute erupted) बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील, बी जी पाटील यांनी  पंढरीत येवून काही जणांच्या हकालपट्टीची घोषणा केली आहे आणि नितीन बागल यांचा कसलाही संबध संघटनेशी राहिला नसल्याचे सांगितले आहे.


यांची झाली हकालपट्टी !
पंजाबराव पाटील यांच्या घोषणेनुसार नितीन बागल यांच्यासह रमेश गणगे, रामदास खराडे, उमेश देशमुख, साजिद मुल्ला यांची बळीराजा शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र बागल यांनी संघटना आपलीच असल्याचे म्हटले आहे त्यामुळे ही संघटना नक्की कुणाची हा प्रश्न सद्यातरी अनुत्तरीतच राहिला आहे.  


हे जरूर वाचा : >>

(खालील बातमीला टच करा )



अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा ! 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !