BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ जून, २०२२

पंढरपूर - कुर्डूवाडी रस्त्यावर एस. टी चा अपघात !



पंढरपूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी बसचा पंढरपूर - कुर्डूवाडी मार्गावर अपघात झाला असून या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असले तरी सुदैवाने ७६ प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत.


पंढरपूर - कुर्डूवाडी मार्गावर अनेकदा राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे अपघात झाले आहेत. हा मार्ग अलीकडे प्रचंड धोकादायक बनला असून सतत छोटे मोठे अपघात होतच असतात पण आज प्रवाशांनी खच्चून भरलेल्या एस टी बसला मोठा अपघात झाला पण सुदैवाने जीवितहानी झाली नाही. बसमध्ये खच्चून प्रवाशी भरलेले असताना देखील जीवितहानी झाली नाही. बसचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बसमधील पंधरा प्रवासी मात्र जखमी झाले आहेत. 

मिरज आगारातील राज्य परिवहन महामंडळाची मिरज - माजलगाव बस (एम एच ०६ एस ८३७१) पंढरपूरहून कुर्डूवाडीकडे निघाली असताना कुर्डू हद्दीत हा अपघात झाला. आदिशक्ती मंगल कार्यालयाजवळ असलेल्या सिमेंट काँक्रीट मिक्स प्लांटमधून अचानक एक डंपर (एम एच ४५ टी १०५५) हा रस्त्यावर आला. हा डंपर अचानक रस्त्यावर आल्याने काही कळायच्या आत एस टी बसची डंपरला पाठीमागून जोरदार धडक झाली. (Bus Accident-Pandharpur-Kurduwadi road) या अपघातात एस टी बस च्या समोरच्या उजव्या बाजूचे मोठे नुकसान झाले 


पंधरा प्रवासी जखमी 
अचानक झालेल्या या अपघातामुळे बस मधील प्रवाशांत एकच गोंधळ उडाला. अचानकपणे जोरदार धडक झाल्याने बसमधील १५ प्रवासी जखमी झाले आहेत. बसमध्ये ७६ प्रवासी प्रवास करीत होते परंतु केवळ जखमी होण्यावरच निभावले आणि ७६ प्रवाशांचे प्राण सुदैवाने बचावले आहेत. बाजूला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे मोठी दुर्घटना टळली अन्यथा बस पंधरा फूट खोल खड्ड्यात गेली असती अशी परिस्थिती अपघातस्थळी निर्माण झाली होती. 



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !