BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ जून, २०२२

कोरोना रुग्णांत मोठी वाढ, सतर्कता बाळगण्याचे आवाहन !

 



राज्यात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले असून मुबई परिसरात तर उद्रेक होऊ लागला आहे तर ग्रामीण भागातील रुग्णांची संख्याही वाढती असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येऊ लागले आहे.


कोरोनाची तिसरी लाट ओसरली आणि सगळेच बेफिकीर झाले, कोरोना पूर्णपणे निघून गेला आणि आता त्याचा कसलाही धोका नाही, तो पुन्हा येणारच नाही अशा अविर्भावात नागरिक समाजात वावरत आहे. कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाही नागरिकांनी त्याकडे गंभीरपणे पहिले नाही. जून महिन्यात कोरोनाची चौथी लाट येवू शकते असे तज्ञ सांगत राहिले पंरतु बहुसंख्य नागरिकांनी हे गंभीरपणे घेतले नसल्याचे दिसून येत आहे. जून महिन्याच्या आधीच राज्यात कोरोनाचे  नवे रुग्ण आढळून येऊ लागले आणि जून महिन्याच्या सुरुवातीपासून या रुग्णवाढीला वेग आला आहे.   


मुंबई, ठाणे, पुणे अशा शहरातील परिस्थिती लक्षात घेतली तर चिंता निर्माण करणारी परिस्थिती पुन्हा तयार झाली आहे. कोरोना रुग्णांची वाढ पाहता राज्य शासनाने आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत. (Rapid growth of corona patients again in Maharashtra) रोज कोरोनाचे रुग्ण वाढत असताना रविवारी एका दिवसात राज्यात १ हजार ४९४ नवे रुग्ण आढळले आहेत त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६ हजार ७६७ वर पोहोचली आहे  


आजवर कोरोनाने सगळीकडे भलताच धिंगाणा घातलेला असून राज्यात १ लाख ४७ हजार ८६६ व्यक्तींना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. ७७ लाख ३८ हजार ५६४ व्यक्तींना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. राज्यातील मृत्यू दर १.८७ टक्के एवढा असून रुग्ण बरे होण्याचा दर ९८.०४ टक्के  एवढा आहे.


राज्यातील नवी वाढ !

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, पालघर, रायगड पनवेल मीरा भाईंदर, वसई विरार, निजामपूर या शहरांचा समावेश मुंबई विभागात होत असून या विभागात नव्या १ हजार ३६२ कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर नाशिक विभागात १३ नवे रुग्ण आढळून आले आहेत.  सोलापूर, सातारा, पुणे या विभागात एका दिवसात नव्या ९९ रुग्णांची वाढ झाली असून कोल्हापूर विभागात २ नवे रुग्ण आढळून आले आहेत. औरंगाबाद विभागात ८, लातूर विभागात १ अकोला - ४, नागपूर - ५ असे नवे रुग्ण आढळले आहेत.


सोलापूर जिल्ह्यातही वाढ 

सोलापूर शहरात एकही कोरोना रुग्ण नव्हता आणि जिल्हा ग्रामीण भागात देखील सक्रीय रुग्णांची संख्या नगण्य उरली होती. आता मात्र सोलापूर जिल्ह्यात वाढ होताना दिसून येत आहे. रविवारच्या अहवालानुसार  सोलापूर शहरात एक आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ३ नवे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात १४५ चाचण्यातील हे तीन रुग्ण आहेत. 


डॉक्टर पॉझिटिव्ह !

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण नव्हता परंतु पुन्हा एक रुग्ण आढळला असून सदर रुग्ण हे खाजगी रुग्णालयातील डॉक्टर असून त्यांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. (Solapur Corona) त्यामुळे सोलापूर शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. 


ग्रामीणमध्ये पाच रुग्ण 

सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात सद्या ५ रुग्ण सक्रिय असून यात बार्शी तालुक्यातील दोन, मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुकयातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश  आहे. पंढरीची आषाढी वारी जवळ आली असून वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरीत मात्र चिंता व्यक्त केली जात आहे.   


हे जरूर वाचा : >>

(खालील बातमीला टच करा )





अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा ! 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !