BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ जून, २०२२

बोगस कर्ज प्रकरणी बँक व्यवस्थापकासह कर्जदारावर गुन्हा !



पंढरपूर : पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावाने ठिबक सिंचन कर्जांची बोगस प्रकरणे करून मोठा अपहार केल्याच्या प्रकरणी बँकेच्या  व्यवस्थापकासह २५ कर्जदारांवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील एका राष्ट्रीयकृत बँकेतून शेतकऱ्यांच्या नावाने ठिबक सिंचन कर्जाची बोगस प्रकरणे करून लाखों रुपयांचा अपहार झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. संबंधित शेतकऱ्यांना कर्ज फेडीच्या नोटीसा आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. पंढरपूर तालुक्यातील नेमतवाडी, नांदोरे, पेहे आणि माळशिरस तालुक्यातील जांभूड, नेवरे अशा गावातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांच्या नावाने ठिबक सिंचन संच खरेदीच्या नावाने परस्पर बोगस कर्ज प्रकरणे करण्यात आली आणि मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आल्याची गंभीर आणि धक्कादायक तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रयत क्रांती संघटनेने आणि शेतकरी बांधवांनी अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडेही केली होती.

 
आपल्या नावावर मोठ्या रकमेची कर्जे उचलली असल्याचे संबंधित शेतकरी यांना माहित देखील नाही. पाच वर्षांपूर्वी न घेतलेल्या कर्जाबाबत शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीसा आल्या आणि कर्ज भरण्यास सांगण्यात आले तेंव्हा अनेक शेतकऱ्यांना धक्काच बसला. त्यांनी चौकशी केली असता त्यांच्या नावाने बँकेत कर्ज असल्याचे दिसून आले आणि एकूण प्रकार (Solapur District Crime) उघडकीस आला. 


माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथे असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेतून हा प्रकार (Big fraud) घडला असल्याचे तक्रारीत म्हटले होते. शेतकऱ्यांच्या नावाने ठिबक सिंचन संच खरेदीसाठीची बोगस कर्ज प्रकरणे करून रक्कम लाटली गेली आहे, त्यामुळे बँकेच्या तत्कालीन शाखाधिकारी यांच्यावर तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या अन्य काही लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती आणि या मागणीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित बँकेच्या दारात बोंबाबोंब आंदोलन देखील केले होते.


सदर प्रकरणाची चौकशी होऊन ९२ लाख ६० हजार रुपयांच्या अपहार प्रकरणी बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक  यांच्यासह  २५ कर्जदारांवर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहाराच्या मोठ्या तक्रारीनंतर बँकेने खास एक अधिकारी नियुक्त करून एकूण प्रकरणाची चौकशी केली. या चौकशीत तत्कालीन व्यवस्थापकाने सन २०१३ ते २०१८ या कालावधीत २५ शेतकऱ्यांच्या नावाने ९२ लाख ६० हजार रुपयांची  बोगस कर्ज प्रकरणे करून, कर्ज उचलून ही रक्कम स्वत: घेतली असल्याचे चौकशीत आढळून आले होते. (
Case file against bank manager in bank fraud case) त्यानुसार तत्कालीन व्यवस्थापक यांच्याबरोबर २५ कर्जदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


फसवणुकीचा मोठा प्रकार !
शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढून मोठी रक्कम लाटण्यात आली असून हा फसवणुकीचा मोठा प्रकार असण्याची शक्यता आधीपासूनच  व्यक्त करण्यात येत होती. आपण एक रुपयांचे देखील कर्ज घेतले नसताना आपल्या नावावर कर्ज दाखविण्यात आले आहे (Fraud by taking out loans in the name of farmers) याचा मोठा धक्का या शेतकऱ्यांना बसला आहे. 

शेतकरी अडचणीत !
शेतकरी वर्ग आधीच वेगवेगळ्या संकटात आणि अडचणीत सापडत असताना या प्रकरणाने तो अधिकच अडचणीत आला आहे. कधीही न घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची नोटीस बँकेने त्यांना दिली तेंव्हा तर त्यांची झोप उडाली शिवाय या प्रकाराने कारण नसताना हे शेतकरी 'थकबाकीदार" (Defaulter farmers) म्हणून गणले जात आहेत आणि त्यांना इतर बँकाही पीक कर्ज देत नाहीत. अखेर या सर्व प्रकारची चौकशी झाली आणि संबंधितावर गुन्हा दाखल झाला. 


दिशाभूल करणारा गुन्हा !

आमच्या तक्रारीप्रमाणे कर्जाची चौकशी न करता केवळ मुद्रा लोन प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. आज दाखल झालेल्या गुन्ह्याशी शेतकऱ्यांचा संबंध नाही त्यामुळे हा गुन्हा दिशाभूल करणारा असून याप्रकरणी आम्ही पुन्हा नव्याने चौकशीची मागणी करणार आहोत असे राष्टवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष (वक्ता सेल) सुमित अभिमान भोसले यांनी सांगितले आहे.


हे जरूर वाचा : >>

(खालील बातमीला टच करा )


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !