BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ जून, २०२२

शिवराज्याभिषेकासाठी निघालेल्या युवकाचा अपघाती मृत्यू !

 



सातारा : शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी निघालेल्या मंगळवेढ्याच्या शिवप्रेमी तरुणाचा अपघाती मृत्यू झाला असून या अपघातात एकूण दोघे जण मृत्युमुखी पडले आहेत. 


मंगळवेढा येथील शिवप्रेमी तरूण आकाश भोसले हे दुचाकीवरून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी निघालेले असताना तीन दुचाकींचा अपघात महाबळेश्वरपासून एक किमी अंतरावर झाला. हॉटेल अप्सरा ते महाड नाका परिसरातील वळणावर तीन दुचाकींची एकत्र धडक झाली आणि या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले तर दोघे जखमी झाले आहेत. मृतात मंगळवेढा येथील आकाश  तानाजी भोसले आणि महाबळेश्वर येथील जुबेर मुस्तफा मानकर या दोघांचा समावेश आहे. तर मंगळवेढा येथील दारीबा सुनील बळवंतराव उर्फ गोट्या आणि महाबळेश्वर येथील अमीन बिस्मिल्ला शेख हे दोघे जखमी झाले आहेत. 


हिरो डिलक्स दुचाकी महाबळेश्वरकडून महाडकडे अत्यंत भरधाव वेगाने निघाली होती तर समोरून स्प्लेंडर मोटार सायकल आणि आणखी एक दुचाकी येत होती. या तीन दुचाकीत जोरदार धडक झाली. या अपघातात दोघे जागीच ठार झाले तर दोघे जखमी झाले. महाबळेश्वरकडून महाडकडे निघालेल्या हिरो डिलक्स (एम एच १३ सी अर्र ७१९३) या वेगातील वाहनामुळे अपघाताची ही घटना घडली (Accidental death of a Shivapremi youth of Mangalavedha) असून या दुचाकीच्या चालकाविरुद्ध महाबळेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


मंगळवेढ्यात शोक 

आकाश भोसले या तरुणाच्या अपघाती मृत्यूमुळे मंगळवेढ्यात शोक व्यक्त करण्यात येत असून आकाशच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले होते आणि आता आकाशचा देखील असा अपघाती मृत्यू झाल्याने भोसले कुटुंबाचा आधारच नाहीसा झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या जुबेर मानकर याचा अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेला होता.   


A young Shivapremi youth from Mangalwedha, who was on his way to Shivrajyabhishek ceremony, died in an accident and a total of two people died in the accident.

हे जरूर वाचा : >>

(खालील बातमीला टच करा )


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !