BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ जून, २०२२

एकाच गावच्या तीन तरुण मित्रांचा अपघाती मृत्यू !

 



जत : एका दुचाकीवरून तिघांनी बसून जाणे भलतेच महागात पडले असून धोकादायक वळणावर अपघात होऊन तीन मित्रांचा मृत्यू होण्याची अत्यंत दुर्दैवी घटना जत - कोसारी रस्त्यावर घडली आहे.


दुचाकीवर दोन पेक्षा अधिक व्यक्तींना बसण्यास कायद्यानेच मनाई आहे परंतु जीव धोक्यात घालून एक दुचाकीवरून चार पाच व्यक्ती जाताना देखील दिसत असतात. असा प्रवास हा कायम धोक्याचा असून यामुळे अपघात होऊन काही जीव गेले आहेत तरी देखील असे प्रकार घडत असल्याचे अधूनमधून पाहायला मिळते. अशा प्रवासामुळे सांगली जिल्ह्यातील तीन तरुण मित्रांचा अपघाती मृत्यू होण्याची घटना घडली आहे. जत तालुक्यातील कोसारी येथील चार मित्र एकाच दुचाकीवरून प्रवास करत होते आणि कुठल्याही वाहनासोबत अपघात न होता दुचाकी चालकाचाच ताबा सुटला आणि गंभीर अपाघात झाला. या अपघातात तीन तरुण मित्र मृत्युमुखी पडले तर एक जखमी झाला आहे. 


जत येथून कोसारी गावाकडे निघालेल्या या चार मित्रांचा विजयपूर - गुहागर राष्ट्रीय मागामार्गावर बिरानाळ ओढ्याजवळील एका वळणावर अपघात झाला अजित भोसले आणि त्याचे तीन मित्र असे चौघे एकाच मोटार सायकलवरून जत येथे आले होते आणि जत येथून ते आपल्या कोसारी गावी परत निघाले होते. ओढ्याच्या जवळ असलेल्या वळणावर दुचाकी चालकाचा ताबा सुटला आणि दुचाकी बाजूला जावून पडली. दुचाकीचा वेग देखील अधिक असल्यामुळे दुचाकी वेगाने खाली पडली आणि चौघानाही जोराचा मार लागला. (Accidental death of three young friends) झालेल्या या अपघातात अजित भोसले हा २२ वर्षे वयाचा तरुण जागीच ठार झाला तर त्याचे अन्य मित्र जबर जखमी झाले.

 
रुग्णालयात हलवले पण --


अपघाताची माहिती मिळताच बिरानाळ येथील गावकरी धावत घटनास्थळी गेले आणि त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.  अजित भोसले याचा  जागीच मृत्यू झाल्याचे गावकऱ्यानी पहिले त्यामुळे गंभीर जखमी असलेल्या तिघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले पण अत्यंत गंभीर स्वरूपाचे जखमी झालेले असल्यामुळे अन्य दोन मित्रांचाही मृत्यू ओढवला. 


तिघेही तरुण मित्र !


या अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघेही तरुण मित्र होते आणि एकाच दिवशी एकाच गावातील तीन मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने कोसारी गावावर देखील शोककळा पसरली. अजित नेताजी भोसले (वय २२), मोहित शिवाजी तोरावे (वय २१) आणि राजेंद्र भाले (वय २२) अशी मृत मित्राची नावे असून संग्राम विक्रम तोरेवे हा १६ वर्षाचा मुलगा मात्र जखमी होण्यावरच निभावला आहे. 


हे जरूर वाचा : >>

(खालील बातमीला टच करा )





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !