BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ जून, २०२२

पंढरपूर तालुक्यातील बेपत्ता व्यक्तीचा खून !



पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील बेपत्ता असलेल्या भानुदास माळी यांचा गळा आवळून खून झाला असल्याचे उघडकीस आले असून या घटनेने खळबळ उडाली आहे. आर्थिक  व्यवहार आणि अनैतिक संबध यातून ही  घटना घडली आहे.


पंढरपूर तालुक्यातील सुपली येथील भानुदास माळी हे सुपली येथील आपल्या घरातून २८ मे रोजी बाहेर पडले. पंढरपूर येथे जाऊन पैसे घेऊन येतो असे सांगून दुपारी ते घराबाहेर पडले आणि परत घरी आलेच नाहीत. पंढरपूर येथे जाऊन परत येणारे माळी हे परत घरी न आल्याने घरात चिंता व्यक्त होऊ लागली आणि कुटुंबीयांनी त्यांची सगळीकडे चौकशी करीत शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी भानुदास माळी हे बेपत्ता झाल्याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला. ज्यांच्याकडून पैसे घेवून येतो म्हणून ते बाहेर पडले होते त्याच्याकडे भानुदास माळी यांची चौकशी सुरु केली आणि तपासाची चक्रे वेगाने फिरत राहिली. 

 

दरम्यान लातूर जिल्ह्यातील पानचिंचोली येथील जहिराबाद मार्गावर रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात एका अनोळखी पुरुषाचे प्रेत आढळून आले होते आणि त्यानुसार निलंगा पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी चौकशी सुरु केली असता प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अमरनाथ किने यास ताब्यात घेतले आणि चौकशी सुरु केली.  पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी सुरु करताच अमरनाथ याने गुन्हाची कबुली दिली आणि एका महिलेच्या मदतीने पंढरपूर येथून भानुदास माळी यास घेवून आलो आणि पान चिंचोली रस्त्यावर गाडीमध्येच त्याचा गळा आवळून खून केल्याची माहिती देखील त्याने दिली. मयत भानुदास माळी हे एका महिलेच्या आणि पुरुषाच्या संपर्कात असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाचा उलघडा झाला. 


पैशाच्या व्यवहारातून आणि महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सदर महिलेस ताब्यात घेवून निलंगा पोलीस ठाण्यात नेले आणि चौकशी सुरु केली. या चौकशीत या महिलेने देखील गुन्हा कबूल केला आहे. (Murder of a missing person in Pandharpur taluka) महिलेचा मित्र अमरनाथ किने याच्या मदतीने आर्थिक व्यवहार आणि अनैतिक संबध यातून त्यांचा खून करण्यात आला अशी माहिती सदर महिलेने पोलिसांना दिली आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !