BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ ऑग, २०२२

आमदार विनायक मेटे यांना मारण्याचा आधीही झाला होता प्रयत्न !

 


शोध न्यूज : आमदार आणि शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांना अपघाताच्या आधीही मारण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा शिवसंग्रामचे कार्यकर्ते अण्णासाहेब मायकर यांनी केल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 


आमदार विनायक मेटे यांचा मुंबई- पुणे दरम्यान एक्सप्रेस वे वर अपघात झाला होता आणि या अपघातात विनायक मेटे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने राज्यात दु:ख व्यक्त होत असतानाच त्यांच्या या अपघाताबाबत मोठी शंका घेण्यात आली. कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी हा अपघात नसून घातपात आहे असे सांगत काही मुद्देही उपस्थित केले आहेत आणि या घटनेच्या चौकशीची मागणी केली. आ. विनायक मेटे यांच्या आईनेशी संशय व्यक्त केला आणि त्यानंतर स्व. आमदार विनायक मेटे यांच्या डॉक्टर असलेल्या पत्नींनी धक्कादायक खुलासा केला होता. मृत्युनंतर लगेच चेहरा पांढरा पडत नाही पण आपण रुग्णालयात मेटे यांचा चेहरा पहिला तेंव्हा त्यांचा चेहरा जास्तच पांढरा पडला होता. असे कधी घडत नसते असे डॉक्टर असलेल्या मेटे यांच्या पत्नीने स्पष्टपणे सांगून शंका व्यक्त केली आहे. 


अपघाताबाबत अनेक घटना प्रश्न उपस्थित करीत असून त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे. रस्त्यावर ज्या ट्रकने मेटे यांच्या कारला कट मारला होता असे सांगितले गेले आहे त्या गाडीच्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. मेटे यांच्या कारचा चालक आणि ट्रकचालक यांची समोरासमोर चौकशी केली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. या चौकशीत पोलिसांच्या हाती काही लागण्याची शक्यता व्यक्त होत असून पोलीस या घटनेची बारकाईने चौकशी करीत आहेत. पोलिसांच्या तपासात बरीच काही माहिती आणि सत्य देखील समोर येणार आहे पण त्या आधी शिवसंग्राम पक्षाचे कार्यकर्ते अण्णासाहेब मायकर यांनी एका वृत्तवाहिनीला मोठी माहिती दिली आहे. 


मेटे यांचा अपघात हा घातपात असल्याचा संशय अनेकांकडून व्यक्त होत असताना मायकर यांचा दावा प्रचंड खळबळ उडवून गेला आहे. मेटे यांच्या गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न यापूर्वीही झाला होता असा दावा त्यांनी केला आहे. (Earlier there was an attempt to kill MLA Vinayak Mete) या दाव्यामुळे मेटे यांचा झालेला अपघात हा घातपात असल्याच्या संशयाला बळ मिळू लागले आहे. अपघाताचा पहिला प्रयत्न हा काही फार जुना नसून याच महिन्यात ३ ऑगस्ट रोजी झाल्याचे माळकर यांनी सांगितले आहे. हा प्रयत्न झाल्यानंतर मेटे यांच्या गाडीचा अवघ्या काही दिवसातच मुंबई मार्गावर अपघात झाला आहे आणि अपघात होताच संशयाचे धुके गडद झाले आहे. 


खळबळजनक दावा !

बीडवरून मुंबईला निघाल्यानंतर आपण ३ ऑगस्ट रोजी विनायक मेटे यांच्यासोबत होतो तेंव्हा हा प्रकार घडला आहे असे मायकर यांनी सांगितले आहे. (secret explosion) शिक्रापूर येथे आमच्यापुढे अडीच किमी अंतरावर एक आयशर गाडी होती. त्याचवेळी एक चार चाकी गाडीही होती आणि या गाडीत दोन चार लोक होते, या गाडीने आम्हाला दोन वेळा कट मारला आणि आम्हाला गाडी पुढे घ्या म्हणून हाताने सांगत होते. यावेळी 'आपल्याला मिटींगसाठी उशीर होतोय, आपली गाडी आयशर मागेच राहू द्या' असे विनायक मेटे यांनी सांगितले.  या घटनेबाबत दुसऱ्या दिवशी भाचा आकाश जाधव यांच्याशीही चर्चा झाली होती. अशी माहिती मायकर यांनी दिली आहे.  


संशय अधिक वाढला !

विनायक मेटे यांच्या अपघातानंतर घातपाताची शंका व्यक्त होत असतानाच मायकर यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने या घटनेतील संशयाला अधिकच बळ मिळाले आहे. त्यात अपघात झाल्यानंतर देखील मदत मिळण्यात एक तासापेक्षा उशीर झाला होता असे मेटे यांच्या जखमी कार चालकाने सांगितलेले आहे. समोर येत असलेल्या घटनातून 'कुठे तरी पाणी मुरतेय' असे चित्र निर्माण झाले आहे.  


मास्टरमाईंड कोण ? 

शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांनी देखील या अपघाताबाबत स्पष्ट शब्दात संशय व्यक्त केला असून महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. नेत्यांचा सुवर्णकाळ सुरु होण्याच्या वेळीच अपघात कसे होतात? अशा अपघातात चालक मात्र कसे जखमी होत नाही ? कदाचित यांचा मास्टरमाईंड एकच असू शकतो, याची शहानिशा व्हायला हवी असे सय्यद यांनी म्हटले आहे. 


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !