BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ जून, २०२२

विद्यमान आमदार देवेद्र भुयार यांना कारावास आणि दंडाची शिक्षा !


स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केलेले आमदार देवेंद्र भ्य्यार यांना तीन महिने कारावास आणि पंधरा हजार दंड अशी शिक्षा अमरावती जिल्हा न्यायालयाने सुनावली आहे.


गटविकास अधिकारी यांच्या अंगावर माईक आई पाण्याची बाटली फेकून मारल्याच्या प्रकरणी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. पाणी टंचाईच्या विषयावर जिल्हा परिषदेत २०१९ मध्ये विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री, गटविकास अधिकारी सुभाष बोपटे आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह अन्य काही जण उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी सुभाष बोपटे हे पाणी टंचाईच्या विषयावरील माहिती देत होते, यावेळी आमदार भुयार यांनी त्यांच्यावर माईक आणि पाण्याची बाटली फेकून मारली. या प्रकाराने बैठकीत एकच गोंधळ उडाला होता आणि अचानक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर घटना घडल्यानंतर आमदार देवेंद्र भुयार यांना तेथून बाहेर काढण्यात आले होते. 

  

आमदार भुयार यांनी केलेल्या या प्रकरणी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री यांनी भुयार यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा तसेच धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटल्याची सुनावणी होऊन जिल्हा न्यायालयाने भुयार यांना भारतीय दंड विधान कलम ३५३ (शासकीय कामात अडथळा ) नुसार दोषी धरले आणि तीन महिने कारावास व पंधरा हजार दंड अशी शिक्षा सुनावली आहे. (MLA Devendra Bhuyar sentenced to imprisonment and fine) दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.


 बोंडे यांना केले होते पराभूत 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर चर्चेत आलेले आमदार देवेद्र भुयार हे मोर्शी मतदार संघातील विद्यमान आमदार असून त्यांनी तत्कालीन कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला होता. भुयार यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता तेंव्हा ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते.

  

साक्षीदार फितूर नाही 

सदर खटल्याची सुनावणी सुरु असताना या गुन्ह्यातील एकही साक्षीदार फुटला नाही हे विशेष मानले जात आहे. या खटल्यात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले आणि गटविकास अधिकारी सुभाष बोपटे यांची साक्ष न्यायालयात महत्वपूर्ण ठरली.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !