BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ ऑग, २०२२

भूसंपादनात टक्केवारीचा आरोप करीत 'प्रहार' चे उपोषण सुरु !




मंगळवेढा : भूसंपादन करताना सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यावर अन्याय झाल्याची तक्रार करीत प्रहार संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. 


मंगळवेढा उपविभागीय कार्यालयासमोर आजपासून हे आंदोलन सुरु करण्यात आले असून न्याय मिळेपर्यंत माघार न घेण्यावर प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाम आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ साठी सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यतील जमिनी संपादन करण्यात आल्या पण  शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. ज्या काही शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला त्या शेतकऱ्यांकडूनही मोबदला देण्यासाठी टक्केवारी घेतली गेली असून सांगोला आणि मंगळवेढा त्लौक्यातील भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अपहार झाला असल्याचा आरोप प्रहार संघटनेकडून करण्यात आला आहे. काही अधिकारी मंडळीनी हा प्रकार केला असून त्यांच्यावर कसलीही कारवाई होत नाही असा आरोप देखील आंदोलनकर्त्यांनी केला आहे.   


या प्रकरणात काही गावातील पुढारी, एजंट आणि अधिकारी यांनी संगनमताने सरकारी असलेली जमीन खाजगी दाखवून मोबदला लाटला आहे परंतु याबाबत कसलीही कारवाई करण्यात येत नाही. संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अशी मागणी या आंदोलकांची आहे.  मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील जमीनीची भूमी अभिलेख कार्यालयाकडून अनधिकृत मोजणी करून तेथील शेतकऱ्याची दिशाभूल करण्यात आली आहे त्यामुळे उप विभागीय कार्यालयातील आणि भूमी अभिलेख कार्यालयातील संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. यासाठी प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्राय्या माळी हे आजपासून उपोषणाला बसलेले आहेत.

 

संघटनेचे जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील, जिल्हा युवा अध्यक्ष संतोष पवार,प्रहार जनशक्ती पक्ष तालुका उपाध्यक्ष राकेश पाटील, मंगळवेढा  तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे, प्रहार अपंग क्रांती तालुका उपाध्यक्ष रोहिदास कांबळे, युवराज टेकाळे, राहुल खांडेकर, नवनाथ मासाळ, अनिल दोंडमिसे, नागेश मुदगुल, दिलावर मुजावर, बाळु वाघमारे, बिरू शिंदे,प्रकाश शिंदे, निलेश कांबळे, मच्छिंद्र कांबळे व (Corruption in land acquisition Movement of strike organization) पिडीत शेतकरी उपस्थित होते. अन्याय झालेल्या शेतकऱ्यांकडून या आंदोलनाला समर्थन मिळताना दिसत आहे. सदर आंदोलन सोलापूर जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आले आहे.


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !