BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ सप्टें, २०२२

मृत्यूला असेही निमंत्रण दिले जाते !

 


शोध न्यूज : सेल्फी आणि रील्स बनविण्याचे नवे फॅड भलतेच लोकप्रिय होत असून अशा प्रयत्नात रेल्वेला धडकल्याचा अंगावर काटा आणणारा एक व्हिडीओ व्हायरल होत असून ही घटना बरेच काही बोलून गेली आहे.

 

सेल्फी घेण्याच्या मोहात नुकतीच सोलापूर येथे एक घटना घडली आहे आणि एका महाविद्यालयीन तरुणाचा भाजून मृत्यू  झाला आहे. उभ्या रेल्वेच्या इंजिनावर चढून सेल्फी घेण्याचा मोह अनावर झाला आणि इंजिनवर चढून तो सेल्फी घेऊ लागला. याचवेळी नकळत त्याचा स्पर्श वरच्या बाजूला असलेल्या विद्युत प्रवाह असलेल्या तारेला झाला आणि तो दूर फेकला गेला. त्याच्या अंगावरील कपडे तर जळून गेलेच पण तो पूर्णपणे भाजला गेला. यातच त्याचा मृत्यूही झाला. अशा अनेक घटना सतत घडत आहेत. डोंगर कड्यावरून अनेक तरुण तरुणी दरीत कोसळून मृत्युमुखी पडल्या आहेत. अशा घटना सतत घडत असतानाही सेल्फीचा मोह सुटत नाही आणि अनेकदा जीव गमावून बसावे लागते. 


सेल्फीच्या घटना होत असताना आता रील बनविण्याचा प्रकार लोकप्रिय होत आहे. रील बनवतानाही मोठा धोका पत्करला जातो आणि मग जीव कधी गेला हे देखील समजत नाही. घटना घडून गेल्यावर हाती काहीच उरत  नाही. अशा प्रकारचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही आणि अघोरी धाडस करून जीव किती स्वस्त आहे हेच हा व्हिडीओ दर्शवत आहे. हा व्हिडीओ पाहून तरी पुन्हा कुणी असे धाडस करणार नाही. इंस्टाग्राम रील बनवताना एक किशोरवयीन मुलगा अत्यंत अघोरी धाडस करीत आहे. ( Shocking Death is also invited viral video) हा मुलगा तेलंगणामधील हनुमानकोंडा जिल्ह्यातील काजीपेट येथील असून रेल्वे रुळावर त्याने रील बनविण्याचा प्रयत्न केला आहे. 

 

वेगात रेल्वे येत असताना हा रेल्वेच्या रुळाजवळून चालत आहे आणि त्याचे मित्र मोबाईल कॅमेऱ्यात ते चित्रित करीत आहेत. धाड धाड करीत रेल्वे पाठीमागून हेत आहे पण तो रुळापासून थोडासाही बाजूला जाण्यास तयार नाही. रेल्वे येथे आणि एका क्षणात त्याला उडवून आपल्या मार्गाने निघून जाते. डोळ्याचे पाते लवायच्या आत त्या मुलाची जी अवस्था होते ते डोळ्याला पाहावत नाही. रुळावरची खडी त्याच्या रक्ताने लाल होऊन जाते आणि या तरुणांची अवस्था पाहावत नाही. मृत्यूला कसे निमंत्रण दिले जाते हे या व्हिडीओत पाहायला मिळत असून कुणीही अशा प्रकारचे धाडस करून नये हेच या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !