BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ मे, २०२२

बायकोला साडी नेसता येत नाही म्हणून तरुणाची आत्महत्या !



शोध न्यूज : बायकोला साडी नेसता येत नसल्याच्या कारणावरून पंचवीस वर्षाच्या एका तरुणाने थेट गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक आणि तितकीच चिंताजनक घटना घडली आहे. 


अलीकडे तरुणवर्गात विविध कारणामुळे नैराश्य येताना दिसत असून या नैराश्यातून बाहेर येण्याऐवजी आत्महत्या करण्याचा टोकाचा मार्ग निवडला जात आहे. तरुणांच्या होत असलेल्या आत्महत्या हा मोठ्या चिंतेचा विषय बनू लागला असून जगण्यापेक्षा मरणे स्वस्त झाल्याचे चित्र दिसत आहे तर पालकवर्गात अशा घटनांमुळे प्रचंड चिंता व्यक्त होत आहे. बेकारी, कर्जबाजारी अशा कारणामुळे तर आत्महत्या होतच आहेत पण पत्नीला व्यवस्थित साडी नेसता येत  नाही हे देखील आत्महत्येचे कारण ठरले असल्याचे औरंगाबाद येथे समोर आले आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाच्या सुसाईड नोट मधून हा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. 


आपल्या आई वडिलांच्या सोबत अजय समाधान साबळे हा २५ वर्षाचा तरुण आपल्या पत्नीसोबत रहात होता. प्लंबर असलेल्या अजयचे केवळ पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्याची पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी गेलेली होती. अजयने दुसऱ्या मजल्यावरील आपल्या खोलीत जाऊन गळफास लावून घेतल्याचा प्रकार समोर आला तेंव्हा त्याच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला. अजयने आत्महत्या करण्यापूर्वी व्हाटस ऍप वर एक स्टेटस ठेवले होते. ते पाहून त्याच्या एका मित्राला चिंता वाटली म्हणून तो त्याला भेटण्यासाठी त्याच्याकडे आला तेंव्हा त्याला अजयने गळफास घेतल्याचे दिसून आले. (wife did not like the young man's suicide) यानंतर तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले पण त्याचा मृत्यू झाला होता. 


म्हणून आत्महत्या !
अजयने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली एक चिट्ठी पोलिसांना मिळाली असून त्यातून मोठा खुलासा समोर आला. बायको मनासारखी मिळाली नाही, तिला साडी देखील नेसता येत नाही. तिला स्वयंपाक करता येत नाही आणि हॉटेलमधे जेवायला नेले तरी स्वतःची थाळी जेवणानंतर स्वतः च उचलून दुसरीकडे ठेवते असे त्याच्या या चिट्ठीत लिहिलेले आहे. 


लग्नापासून नाराज !
अजय हा त्याचे लग्न झाल्यापासून नाराज होता आणि तेंव्हापासून समाजमाध्यमावर त्याचे निराशाजनक विचार असलेले स्टेट्स ठेवत होता. याबाबत त्याच्या मित्रांनी विचारले असता तो उत्तर देत नव्हता. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अखेर त्याने "आय क्वीट" असे स्टेटस ठेवले आणि त्यानंतर आत्महत्या केली.  


हे देखील वाचा : >>




 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !