BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ मे, २०२२

सोलापूरच्या तरुण पोलिसाने मुंबईत घेतला गळफास !


 

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याने मुंबईत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून आर्थिक अडचणीतून आलेल्या निराशेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. 


पोलिसांना कामाचा प्रंचड ताण असतो, हा ताण सहन करण्याचा प्रयत्न करीत पोलीस कर्मचारी नौकरी करीत असतात. काही कर्मचारी ताण असह्य होवून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना देखील दिसून येतात. कामाचा ताण आणि आर्थिक ताण आला तर अशा घटना अधिक प्रमाणात घडतात. असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील तरुण पोलीस कर्मचाऱ्याच्या बाबतीत घडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील रहिवासी असलेल्या गौतम साबळे या तरुण पोलिसाने मुंबईत राहत्या घरी आत्महत्या केल्याची करुण घटना घडली असून पोलीस दलात या घटनेने प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. (A young policeman from Solapur was hanged in Mumbai) 


करमाळा तालुक्यातील रहिवासी असलेले गौतम साबळे यांनी राहत्या खोलीतच गळफास घेवून आत्महत्या केली असून कर्जबाजारी झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कर्वेनगर येथील इमारतीत साबळे रहात होते. त्यांनी ऍक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेचे कर्ज घेतले होते. आर्थिक अडचणीमुळे या कर्जाचे बँकेचे हप्ते फेडता येत नसल्यामुळे ते निराश झालेले होते आणि याच निराशेतून रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या खोलीत गळफास घेतला आणि आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाली तेंव्हा पोलीस दलात प्रचंड अस्वस्थता आणि हळहळ व्यक्त होऊ लागली. 


एवढे कर्ज कशासाठी ?

पोलिसांनी सदर घटनेची नोंद केली असून करमाळा येथे असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली आहे तथापि साबळे यांनी एवढे  मोठे कर्ज कशासाठी काढले होते याची माहिती मिळालेली नाही. मोठा पगार मिळत असताना देखील कर्जबाजारी (Bank Loan )होंऊन आत्महत्या करण्याची वेळ येणे ही चिंताजनक असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.  



हे देखील वाचा :>>>>

खालील बातमीला टच करा !


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !     


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !