BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ मे, २०२२

'या' बँकेत तुमचे खाते असेल तर सावधान !



मुंबई : तुमचं एसबीआय बँक शाखेत जर खाते असेल तर वेळीच सावध होण्याची गरज असून एक चूक केली तर भलतीच महागात पडण्याची शक्यता आहे. बँकेने देखील ग्राहकांना याबाबत सावध केले आहे. 


हल्ली घरात रक्कम ठेवली तरी चोरांपासून भीती असते आणि बँकेत ठेवली तर सायबर गुन्हेगार तुमचे खाते रिकामे करीत असतात. त्यामुळे ग्राहकांनी दक्ष राहण्याची गरज असते. वेगवेगळ्या प्रकाराने सायबर गुन्हेगार बँक ग्राहकांना फसवतात आणि अनेकांची फसवणूक झाली असल्याचे माहित असतानाही अनेक जण सहजपणे आपल्या एटीएम तसेच खात्याबाबत माहिती देवून रिकामे होतात आणि पुन्हा पश्चाताप करीत बसतात. सायबर गुन्हेगारांचे मोठे वादळ सगळीकडे घोंगावत असून बँकेच्या नावाने मेसेज देवून अथवा बँकेतून बोलत असल्याचे सांगून फोन येतात आणि ग्राहक देखील बँक माहिती विचारात असल्याचे सांगून माहिती देवून पस्तावतात. (Be careful if you have an account with State Bank) अशा प्रकाराबाबत अखंड दक्षता घेण्याची गरज असते. सद्याही असा प्रकार करून फसवणूक करण्याचा प्रयत्न होत आहे. 


बँकेच्या नावाने एक मेसेज येत आहे आणि एका लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जात आहे. "प्रिय ग्राहक, तुमचे एसबीआय बँक डॉक्युमेंट एक्सपायर झाले आहेत, तुमचे अकाउंट ब्लॉक होईल, अकाउंट सुरु करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा'" असा मेसेज बँकेच्या नावाने ग्राहकांना येत आहे. असा मेसेज आल्यास तो लगेच डिलीट करावा असे बँकेकडूनच सांगण्यात आले आहे. आलेल्या एसएमएस मधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, तिकडे दुर्लक्ष करा आणि मेसेज डिलीट करून टाका अन्यथा मोठी फसवणूक होऊ शकते. बँकेने खातेदाराला असा कसलाही मेसेज पाठवलेला नाही असे बँकेने स्पष्ट केले आहे.  सायबर गुन्हेगार डेटा चोरून त्याचा गैरवापर करण्याची शक्यता असते त्यामुळे वेळीच सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. 


लिंकवर क्लिक करू नका 


सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या प्रकाराने फसवणूक करून लाखो रुपयांची फसवणूक करतात . अशा घटना आपल्या आजूबाजूलाही घडताना दिसतात. विविध माध्यमातून हॅकिंग लिंक पाठवून हॅकर्स आपले खाते हॅक करण्याचा प्रयत्न करीत असतात. (Important Note for State Bank Customers) सोशल मीडिया अथवा कोणत्याही प्रकाराने अशा प्रकारचे संदेश पोहोचले तर त्यातील लिंकवर क्लिक करू नका असे आवाहन करण्यात आले आहे. 


हे जरूर वाचा : >>> 

खालील बातमीला टच करा !


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !  

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !