BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ मे, २०२२

देवदर्शनासाठी निघालेल्या नवरदेवाचा दुर्दैवी मृत्यू !

 



बार्शी : नव्या नवरीसह देवदर्शनासाठी निघालेल्या नवरदेवाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला असून बार्शी परिसरात या घटनेने प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. 


अलीकडे सगळीकडेच अपघाताचे प्रमाण वाढले असून रोज अनेकांचे अपघाती मृत्यू होत आहेत. रस्ते चांगले झाले हा एक शाप ठरू लागला आहे. चांगल्या रस्त्यामुळे वाहनांचे वेग वाढलेले असून दुसऱ्याच्या आणि आपल्याही प्राणाची पर्वा न करता वाहने वेगाने धावत आहेत. वाढलेला हा वेग जीवावर उठत आहे आणि अनेकदा आपली चूक नसतानाही कित्येकांना अपघातात आपला जीव गमवावा लागत आहे. त्यातच अनेक रस्त्यांची कामे सुरु आहेत आणि कामे सुरु असताना देखील पुरेशी काळजी घेतली जात नाही. मध्येच मातीचे ढीग, खोदलेले खड्डे असतात आणि त्याचा चालकाला अंदाज येत नाही त्यामुळे देखील अनेक अपघात घडत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पेनूरजवळ भीषण अपघात होवून सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असताना बार्शीच्या एका तरुणाचा लोणंद- फलटण मार्गावर अपघात झाला आणि या अपघातात बार्शी येथील नवरदेवाचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. 


फलटण तालुक्यातील काळज गावाजवळ जीप पलटी होऊन नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. बार्शी येथील सुखदेव रवींद्र वाघमोडे या २६ वर्षीय तरुणाचे नुकतेच लग्न झाले होते. लग्नानंतर वधू - वर देवदर्शनासाठी जाण्याची परंपरा आहे त्यानुसार सुखदेव वाघमोडे हे देखील नव्या नवरीसोबत देवदर्शन करण्यासाठी निघालेले होते. त्यांच्यासोबत काही नातेवाईक देखील होते. जेजुरी येथून नवरा नवरी आणि नातेवाईक फलटण तालुक्यातील धुळदेव येथे दर्शनासाठी निघाले असताना वाटेतच काळाने घाला घातला. त्यांचे वाहन फलटण तालुक्यातील काळज गावाजवळ आले तेंव्हा चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि  गाडी पलटी झाली. लोणंद - फलटण रस्त्याचे सहा पदरीकरण सुरु आहे. रस्त्याची कामे सुरु असताना पुरेशी खबरदारी घेण्यात येत नाही त्यामुळे अशा अपघातांना निमंत्रण मिळत असल्याच्या अनेक घटना आजवर घडलेल्या आहेत. 

 
धावती गाडी पलटी झाल्याने गाडीतील प्रवाशी जखमी झाले यात नवरदेव सुखदेव वाघमोडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने फलटण येथील रुग्णालयात हलविण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. (Accidental Death of groom) नवरी आणि अन्य नातेवाईक देखील या अपघातात जखमी झाले आहेत. 


चालक पळून गेला 
भरधाव वेगाने निघालेली क्रुझर गाडी पलटी होऊन अपघात होताच गाडीचा चालक तेथून पळून गेला. अपघात होताच आजूबाजूचे नागरिक धावत या ठिकाणी आले आणि त्यांनी जखमीना मदत केली. नवरदेवाचा मृत्यू झाल्याने मात्र प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


नवरीला वैधव्य !
नव्या जीवनाची सुरुवात करण्याआधीच आणि अंगाची हळद निघण्याच्या आधीच नवरीच्या नशिबी वैधव्य आले आहे. नवरदेवाचा मृत्यू आणि नवरीचे वैधव्य यामुळे दोन्ही कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. मोठ्या आनंदात आणि उत्साहात विवाहसोहळा झाला पण त्यानंतर लगेच हा आनंद शोकसागरात बुडाला.    


हे जरूर वाचा : >>> 

खालील बातमीला टच करा !

   

अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !