BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ मे, २०२२

प्रवासी बस आणि ट्रक अपघातात आठ जण ठार !

 



भीषण : कोल्हापूरकडून हुबळीकडे निघालेल्या खाजगी बसचा भीषण अपघात होऊन आठ जण जागीच ठार झाले आहेत तर २६ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. 


तांदूळ वाहतूक करणारा ट्रक आणि  कोल्हापूर येथून कर्नाटकमधील हुबळी येथे निघालेल्या बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा अत्यंत भीषण अपघात झाला आहे. हुबळी धारवाडच्या तरीहाळा बायपासवर ही दुर्घटना मध्यरात्री घडली असून या अपघातात आठ जण जागीच ठार झाले असून यातील सहा जण हे कोल्हापूर आणि पुणे येथील असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये दोघे जण कर्नाटक मधील आहेत.  २६ पेक्षा अधिक लोक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हुबळी येथील किम्स रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. 


कोल्हापूर येथील खाजगी प्रवासी बस कोल्हापूर येथून बंगळूर येथे जाण्यासाठी प्रवासी घेवून निघाली होती. हुबळीच्या बायपासवर ही बस आल्यानंतर बस चालकाने एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात तांदूळ घेऊन निघालेल्या ट्रकची आणि या बसची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी जोरात होती की बसच्या समोरच्या भागाचा पूर्णतः चेंदामेंदा झाला आहे. (Eight killed in private bus and truck crash) ट्रकच्या समोरच्या भागाचा देखील चक्काचूर झाला आहे.  


दोन दिवसापूर्वीही अपघात


दोन दिवसांपूर्वीच धारवाड येथे भीषण अपघात झाला होता आणि या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची चर्चा सुरु असतानाच हा दुसरा मोठा अपघात झाला आहे. एका विवाह सोहळ्यावरून क्रुझर गाडीतून परत आपल्या गावी निघाले असताना झालेल्या अपघातात ७ ठार आणि १० जखमी झाले होते. एक क्रुझर गाडीत तब्बल २१ जण प्रवास करीत होते. 


हे जरूर वाचा : >>> 

खालील बातमीला टच करा !



अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा ! 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !