BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ मे, २०२२

पेट्रोल दर कमी करण्याचा हा तर देखावा - मुख्यमंत्री

 


मुंबई : डिझेल आणि पेट्रोलवरील कर कमी करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असल्याने भाजप केंद्राचे आभार मानत असतानाच दर कमी करण्याचा हा देखावा नको अशी घणाघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 


महागाईच्या आगीत सामान्य जनतेची होरपळ सुरु असताना आणि पेट्रोल डिझेल दरात भरमसाठ वाढ झालेली असताना केंद्र सरकारने कर कमी केल्याने पेट्रोल आणि डिझेल दरात मोठी कपात होणार आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर साडे नऊ रुपये तर डिझेल दरात सात रुपयांची कपात होत असली तरी हे दर शंभर रुपयांच्या पुढेच राहणार आहेत. तरी देखील हा एक दिलासा मिळालेला आहे परंतु मोठी वाढ करून छोटी कपात करण्याचा हा देखावा असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून येताना दिसत आहेत. चारशे रुपयात मिळणार गॅस सिलिंडर आता एक हजार रुपयावर गेला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पुन्हा चुली पेटल्या आहेत. काँग्रेस शासनाच्या काळात हा दार अर्ध्याहून कमी होता. इंधनाच्या दरात किरोकोळ पैशांची वाढ झाली तरी आंदोलन करणारा भाजप आज सत्तेत असताना असह्य दरवाढ केली जात आहेच पण भाजपचे काही नेते आजही कुठे आहे महागाई ? असा सवाल उपस्थिती करीत आहेत. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र केंद्र सरकारवर निशाणा साधला असून पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करण्याची मागणी केली आहे. आधी किमती वाढवायच्या आणि नंतर नाममात्र दर कमी करण्याचा देखावा नको अशा शब्दात ठाकरे यांनी टीका केली आहे. दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरील अबकारी कर प्रतिलिटर १८ रुपये ४२ पैसे वाढविला आणि आता तो ८ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. डिझेलवरील हा कर १८ रुपये २४ पैशानी वाढविला आणि आता ६ रुपयांनी कमी केला करून दर कमी केल्याचा आव आणणे अयोग्य आहे. (Chief Minister Thackeray's criticism on fuel price cut) सहा सात वर्षांपूर्वी असलेल्या अबकारी कराएवढी कपात झाली तरच जनतेला दिलासा मिळणार आहे असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.  


लुटलेले पैसे परत करा !

जनतेची लूट करून हजारो कोटी रुपयांचा नफा केंद्र शासनाने कमावला आहे, लूट केलेले जनतेचे पैसे परत करा असा प्रहार महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. निवडणूक जवळ आली की इंधनाचे दर कमी करण्याची बुद्धी केंद्र सरकारला येते असेही ठाकूर यांनी म्हटले आहे.  


नसल्यापेक्षा बरे !

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी या दर कपातीबद्धल अवघ्या चार शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. "काही नसल्यापेक्षा बरे आहे" एवढ्या मोजक्या शब्दात शरद पवार हे बरेच काही बोलून गेले आहेत.


भाषण देण्यापेक्षा --

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महागाईवर भाषण देण्यापेक्षा केंद्राप्रमाणे राज्यात इंधनावरील कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून पाटील यांनी केंद्राचे आभार मानले आहेत.  


हे जरूर वाचा : >>> 

खालील बातमीला टच करा !


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !