BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ मे, २०२२

आश्चर्य ... पेट्रोल डिझेल स्वस्त झाले !



नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून सतत भडकत असलेले इंधनाचे दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्य जनतेला हा मोठा दिलासा लाभणार आहे.

 

महागाई कमी करण्याचे स्वप्नं दाखवत भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेवर आला परंतु भाजप शासनाच्या काळात गॅस, पेट्रोल, डिझेल यांची अवास्तव आणि विक्रमी दरवाढ झाली त्यामुळे सामान्य माणसांचे आर्थिक गणित विस्कटून गेले आहे. जगणेच नाही तर मरणे देखील महाग झाले असून अन्य सर्वच वस्तूसह जीवनावश्यक वस्तू देखील महागल्या आहेत त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. सामान्य माणसांचे काहीच देणेघेणे या सरकारला नसल्याची टीका होत आहे आणि यातच केंद्र सरकारने मोठा आणि दिलासादायक निर्णय घेऊन एक सुखद धक्का दिला आहे. 


पेट्रोलच्या दरात ९ रुपये ५० पैसे तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. सद्याच्या महागाईच्या काळात हा मोठा दिलासा लाभला असला तरी आधीच प्रचंड वाढ केली असल्याने इंधन महागच राहणार आहे परंतु लिटरमागे पेट्रोल ९.५० रुपये तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने करात कपात केल्याने हा मोठा दिलासा मिळणार आहे. इंधनावर लादलेल्या वेगवेगळ्या करामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत. या करात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज ही दिलासादायक घोषणा केली आहे. (Petrol Diesel Price Reduced by Central Governament)  या घोषणेमुळे महसुलात वर्षाला सुमारे १ लाख कोटी रुपयांचा तोटा होणार आहे.  


 पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर विक्रमी वाढले असताना केंद्र शासनाने हा निर्णय घेतला आहे. उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून आज हे ए माहिती दिली आहे. पेट्रोलवर ८ रुपये प्रतिलिटर आणि डिझेलवर प्रतिलिटर ६ रुपये केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्याने पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९ रुपये ५० पैसे आणि डिझेल प्रतिलिटर ७ रुपयांनी कमी होणार आहेत.  पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधनाचे दर कमी होत आहेत. 


महागाईचे काय ?

इंधनाचे दर वाढल्यामुळे प्रत्येक बाबतीत महागाई झाली आहे. महागाईच्या झळा रोज सामान्य माणसांना चटके देत आहेत. इंधनाचे दर वाढल्याने वस्तूच्या किमती वाढल्याचे सांगितले जात असते पण आता इंधनाच्या किमती कमी झाल्यानंतर वाढलेले दर कमी केले जाणार की ही महागाई तशीच ठेवली जाणार ? असा सवाल आता उपस्थित होत आहे. 


आश्चर्यकारक !

पेट्रोल डिझेल म्हटलं की फक्त दरवाढ एवढेच माहित आहे. रोज नवे दर येत असले तरी ते काही पैशांनी का होईना वाढलेलेच असतात पण आता एकदम मोठ्या फरकाने हे दर कमी होते आहेत. गेल्या काही वर्षातील हे एक मोठे आश्चर्य ठरू लागले आहे.  इंधनाचे दर वाढले की बाजारातील सगळीच महागाई वाढलेली असते आणि त्याची मोठी झळ सामान्य जनतेला बसत असते. आता हा दिलासाही सामान्यांना अधिक प्रमाणात मिळणार असून वाढत्या महागाईला काही प्रमाणात तरी आळा बसण्याची अपेक्षा आहे.

हे जरूर वाचा : >>> खालील बातमीला टच करा !



अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !