BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ मे, २०२२

पंढरपूर तालुक्यात वाळूचोरी, आठ जणांना दणका !

 


पंढरपूर : सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पंढरपूर तालुक्यातील वाळू चोरीला जोरदार झटका देत आठ जणांच्या (Sand theft) विरोधात गुन्हा दाखल करून वाळूसह वाहने देखील जप्त केली आहेत. 


पंढरपूर आणि परिसरात प्रदीर्घ काळापासून वाळू चोरांनी उच्छाद मांडला आहे, प्रशासनाकडून अधून मधून कारवाई केल्या जातात पण वाळू चोरी आणि मुजोरी यात कसलाच फरक पडत नाही. काही जणांसाठी तर ही हिरवीगार कुरणे बनली असल्याची चर्चा जनसामान्यात देखील सतत होत असते. रात्रीच्या वेळेस चोरट्या वाळूची वाहतूक करणारी वाहने अत्यंत भरधाव आणि बेफिकीरपणे धावत असतात परंतु प्रशासनाच्या हाती लागत नाहीत. महसूल आणि पोलीस विभाग अधूनमधून कारवाई करीत असते आणि त्याच्या बातम्याही छापून येतात पण वाळू तस्करीत किंचितही कमी होताना दिसत नाही. सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मात्र पंढरपूर तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. 


सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ग्रामीण भागातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केलेले आहेत आणि त्यामुळे पोलिसांना हवे असलेले काही गुन्हेगार गजाआड जाऊन बसलेले आहेत. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बेकायदा वाळू उपसा आणि विक्री करणाऱ्यावर देखील कारवाई करण्यात येऊ लागली आहे. (Action against sand thieves in Pandharpur taluka) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पंढरपूर तालुक्यातील देगाव हद्दीत वाळू उपसा करणाऱ्या आठ जणांवर कारवाई केली आहे. 


देगाव येथे छापा !
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देगाव हद्दीत नदी पात्रातून अवैधरीत्या वाळूचा उपसा केला जात असल्याच्या ठिकाणी छापा टाकला तेंव्हा त्यांना बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा सुरु असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी ४५ ब्रास वाळूसह तीन ट्रॅक्टर असा १७ लाख २५ हजार रुपयांचा माल जप्त केला. पोलिसांचे पथक येथे पोहोचताच अनेकांची पळापळ झाली. 


यांच्यावर गुन्हा दाखल !
देगाव हद्दीत नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा आणि विक्री करणाऱ्या आठ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खंडू नागनाथ पाटुळे, महेश हरी चव्हाण, रोहित कैलास वायदंडे, गमल्या मारुती पवार, आप्पा किसान चव्हाण, सिद्धा चव्हाण, सोमा जाधव, अक्षय घाडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pandharapur  Crime) यातील खंडू आणि महेश या दोघांना अटक करण्यात आली आहे. 


हे देखील वाचा : >>

    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !