BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ मे, २०२२

पत्नी जिवंतच, तिच्या खुनाच्या आरोपात नवरा मात्र तुरुंगात !



पत्नीचा खून केल्याचा आरोपात पोलिसांनी पतीला तुरुंगात डांबले पण प्रत्यक्षात जिचा खून झाल्याचे सांगण्यात आले ती पत्नी मात्र आपल्या प्रियकरासोबत जिवंत असल्याचे वास्तव पोलिसांनाच पाहायला मिळाले. 


अमिताभ बच्चन यांच्या 'अंधा कानून' या चित्रपटात अशीच कथा आहे. ज्याच्या खुनाच्या आरोपाखाली नायकाला पकडले जाते आणि त्याला न्यायालयात शिक्षाही होते. शिक्षा भोगून तो जेंव्हा बाहेर येतो तेंव्हा ज्याचा खून झाल्याचे न्यायालयात सिद्ध होते तोच व्यक्ती जिवंत असल्याचे नायकाला दिसते. चित्रपटातून दिसणारा असा प्रसंग कधीतरी प्रत्यक्षात घडताना दिसतो. अशाच एका धक्कादायक प्रकरणाची उकल पोलिसांनीच केली आहे. पत्नीचा खून केला म्हणून पतीच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल होऊन पतीला अटक देखील झाली. पती तुरुंगात खितपत पडला असताना पोलिसांसमोर एक वेगळेच सत्य आले आणि पोलीसही चक्रावले. 


बिहारच्या मोतीहारी येथे अशीच एक चित्रपटाच्या कथेसारखी घटना समोर आली. लक्ष्मीपुर गावातील शांतादेवीचा विवाह केशरिया येथील दिनेश राम नावाच्या तरुणाशी १४ जून २०१४ रोजी झाला होता. लग्नाला सहा वर्षे झाल्यानंतर शांतादेवी अचानक नाहीशी झाली. शोध घेवूनही तिचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. दिनेश राम याने सगळीकडे तिचा शोध घेतला, माहेरी गेली असावी म्हणून माहेरीदेखील चौकशी केली पण काहीच पत्ता लागत नव्हता त्यामुळे पती दिनेश राम अस्वस्थ झाला होता. शांतादेवीच्या पित्याला मात्र वेगळीच शंका येत होती. लग्नाला सहा वर्षे झाली आहेत आणि अशी अचानक ती बेपत्ता कशी होईल हा प्रश्न शांतादेवीच्या पित्याला पडला होता. 


शांतादेवीच्या पित्याच्या मनात दिनेश राम बद्धल शंका आली. त्यानेच आपल्या मुलीला मारून टाकून तिचा मृतदेह गायब केल्याचा संशय त्यांच्या मनात बळावला आणि त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. शांतादेवीच्या तिच्या पतीनेच म्हणजे दिनेश राम ने खून केला असल्याचा आरोप करून त्यांनी पोलिसात तशी तक्रार देखील दिली. हत्येची घटना आहे म्हटल्यावर पोलीसही सतर्क झाले आणि त्यांनी दिनेश राम याला पकडून थेट तुरुंगात टाकले. शांतादेवीचा मृतदेह मिळाला नाही किंवा अन्य काही धागे दोरे नसतानाही पोलिसांनी पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली दिनेश राम याला तुरुंगात डांबले. 


दिनेश राम गयावया करीत राहिला, आपण असा काहीही प्रकार केला नाही म्हणून तो ओरडून सांगत राहिला पण त्याच्यावर कुणीच विश्वास ठेवला नाही.  प्रत्येक आरोपी आपण निरपराध असल्याचेच सांगत असतो त्यामुळे त्याच्या तळमळून आणि जीवाच्या आकांताने सांगण्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आणि शांतादेवीच्या पित्याला तर तशी खात्रीच होती त्यामुळे दिनेश राम याला तुरुंगात जाण्याशिवाय पर्यायाच उरलेला नव्हता. अटक केल्यानंतर पोलीस त्याच्या मागे लागले होते, शांतादेवीचा मृतदेह कुठे आहे म्हणून पोलीस त्याला विचारात होते आणि तो आपण असे काहीच केले नसल्याचे पुन्हा पुन्हा सांगत होता. 


अखेर सापडली !

शांतादेवीचा मृतदेह मिळत नाही आणि अन्य काही धागेदोरेही हाती येत नाही शिवाय पती दिनेश देखील असे काही घडले नसल्याचे सांगत होता त्यामुळे पोलिसांना काहीशी वेगळी शंका आली आणि त्यांनी त्या दिशेने आपल्या तपासाची चक्रे फिरवली. सायबर पोलिसांची मदत घेत शांतादेवीचा मोबाईल ट्रॅक करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. या दिशेने तपास सुरु झाल्यानंतर सदर महिलेचा मोबाईल जालंधर येथे असल्याची माहिती समोर आली त्यामुळे पोलिसांनी जालंधर येथील पोलिसांना याची माहिती दिली.(The murdered wife is alive, but the husband is in jail) जालंधर पोलिसांनी शोध घेत अखेर शांतादेवीला पकडले आणि त्यानंतर वास्तव समोर आले. 


स्वतःच गेली पळून !

शांतादेवी ही विवाहित असली तरी तिचे प्रेमप्रकरण होते आणि ती प्रियकरासोबत पळून गेली होती. त्याच्यासोबत ती जालंधर येथे स्थायिक झालेली होती. अचानक बेपत्ता झाल्यामुळे तिच्या वडिलांना मात्र जावयाबद्धल शंका आली आणि पोलिसांनी देखील आधीच व्यवस्थित चौकशी न करता थेट दिनेश राम याला तुरुंगात डांबले होते.      


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !