BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ मे, २०२२

सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार दोन गणवेश !

 



✪ ✪ ✪➤ ईद आणि साडे तीन मुहूर्तापैकी असलेल्या अक्षय तृतीया निमित्त हार्दिक शुभेच्छा ! ✪ 

सोलापूर : यावर्षी शाळा सुरु होताच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत दोन गणवेश दिले जाणार असून त्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी शासनाने आठ कोटी नव्वद लाख रुपये दिले आहेत. 

स्थानिक स्वराज्य संस्थातील पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येक वर्षांसाठी दोन गणवेश दिले जातात, मागील वर्षी मात्र एकाच गणवेशावर समाधान मानावे लागले होते. गतवर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मिळण्यास विलंब झाला होता परंतु यावर्षी शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १३ जून रोजी दोन गणवेश दिले जाणार आहेत . यासाठी शासनाकडून २४५ कोटी ५३ लाखांचा निधी देण्यात आला असून सोलापूर जिल्ह्याला ८ कोटी ९० लाख रुपये प्राप्त झाले आहेत. प्रत्येक मुलाच्या गणवेशासाठी प्रत्येकी तीनशे रुपयांप्रमाणे सहाशे रुपये जिले जातात. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाचा दर्जा चांगला असावा आणि गणवेश उसवला किंवा फाटला तर त्यासाठी शाळेतील व्यवस्थापन समितीला जबाबदार धरण्यात येणार आहे. 

विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गणवेशाचा रंग शाळा व्यवस्थापन समितीच ठरवणार असून सोलापूर जिल्ह्यातील १ लाख ४८ हजार ४०५ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जाणार आहेत. गतवर्षी विद्यार्थ्यांना किती गणवेश देण्यात आले आणि एकच गणवेश का देण्यात आला याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागवली होती. कोरोनामुळे शाळा बंद राहिल्यामुळे एकाच गणवेशासाठी शासनाकडून पैसे आले होते त्यामुळे विद्यार्थ्यांना एकच गणवेश देण्यात आला होता अशी माहिती शिक्षण विभागाने उप मुख्यमंत्री अजित पवार यांना दिली होती. 

गणवेशासाठी निधी 
शासनाकडून गणवेशासाठी राज्यातील सर्वच जिल्ह्यांना निधी देण्यात येतो परंतु सोलापूर जिल्ह्यासाठी पुरेसा निधी देण्यात आला आहे. पुणे आणि पालघर या जिल्ह्यांच्या खालोखाल सोलापूर जिल्ह्यासाठी सर्वाधिक निधी देण्यात आला आहे. हा निधी तालुका स्तरावरून संबंधित शाळांच्या व्यवस्थापन समितीच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !