BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ मे, २०२२

पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कोट्यावधींचा दंड !

 



पंढरपूर : महसूल विभागाच्या परवानगीशिवाय दगड आणि मुरूम उत्खनन केल्याबद्धल बावीस शेतकऱ्यांना तब्बल २९ कोटींचा दंड करण्यात आला असून ही रक्कम सात दिवसात जमा करण्याचे आदेश देण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. 


शेतातील दगड काढून खडी क्रशरला विकण्याचे तसे मरूम खोदून विक्री करण्याचे प्रकार अलीकडे सर्रास सुरु आहेत. महसूल कायद्यानुसार असे करता येत  नाही परंतु याची माहिती असली तरी काही शेतकरी आपल्या शेतातील दगड, मुरूम उत्खनन करून अशी विक्री करतात. (Illegal excavations)पंढरपूर तालुक्यातील अशाच प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी महसूल विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून महसूल विभागाने पाहणी करून पंढरपूर तालुक्यातील २२ शेतकऱ्यांना तब्बल २९ कोटी ८ लाख ९९३ रुपयांचा दंड महसूल विभागाने आकाराला असून हा दंड सात दिवसांच्या आत शासनाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे पेहे परिसरातच नव्हे तर पंढरपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 


परवानगीशिवाय पेहे येथील २२  शेतकऱ्यांनी ४० हजार ९९३ ब्रास दगड आणि मुरूम याचे उत्खनन केले आणि परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. चव्हाण यांच्या तक्रारीनंतर महसूल विभागाने दंडाची नोटीस दिली असून सात दिवसात ही रक्कम शासनाकडे जमा न केल्यास महसूल विभागाची थकबाकी म्हणून सात बारा उताऱ्यावर बोजा चढविला जाणार असल्याचेही म्हटले गेले आहे. एकंदर या कारवाईने शेतकऱ्यांना धक्का बसला असून उर्वरित शेतकरी देखील धास्तावले आहेत.  गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी बेकायादेशी उत्खनन करून दगडाचा वापर खडी क्रशरसाठी करण्यात आला होता. (Big fine to farmers in Pandharpur taluka) दादासाहेब चव्हाण यांनी याबाबत महसूल विभागाकडे तक्रार केल्यानंतर महसूल विभागाने पंचनामे केले आणि ४० हजार ९९३ ब्रास दगड, मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन केल्याचे यावेळी निदर्शनास आले होते.   


दंडाची वसुली करावी 
संबधित शेतकऱ्यांकडून अवैध उत्खनन केल्याप्रकरणी दंड वसूल केला जावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चव्हाण यांनी केली आहे महसूल विभागाच्या दंडाच्या नोटीसा मिळाल्यानंतर शेतकऱ्यांत मोठी खळबळ उडाली आहे. उत्खनन केल्याचा आरोप असलेले २२ शेतकरी असून त्यांना कोट्यावधींचा दंड आकारण्यात आला आहे.


खुलासे असमाधानकारक !

तक्रारी आल्यानंतर महसूल विभागाने पाहणी केली आणि संबंधित शेतकऱ्यांना तहसीलदार यांनी नोटीसा बजावल्या आणि खुलाशाची मागणी केली होती. शेतकऱ्यांनी खुलासे दिले परंतु ते समाधानकारक न वाटल्यामुळे तहसीलदार यांनी दंडाच्या नोटीसा बजावल्या.  


मोठ्या रकमेचा दंड 
महसूल विभागाकडून करण्यात आलेला हा दंड मोठा असून २२ शेतकऱ्यांत २९ कोटी रुपयापेक्षा अधिक दंड आकारण्यात आला आहे. एवढा मोठा दंड भरणे शेतकऱ्यांपुढे आव्हान असून दंड नाही जमा केला तर सात बारा उताऱ्यावर हा बोजा चढविला जाणार आहे त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. 



हे देखील वाचा : >>




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !