BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ मे, २०२२

पंढरपूर - मोहोळ रस्त्यावर अपघात, डॉक्टरसह सहा जणांचा मृत्यू !

 



पंढरपूर : पंढरपूर -  मोहोळ मार्गावर अत्यंत भीषण असा अपघात झाला असून या अपघातात एक डॉक्टरसह सहा जण ठार झाले आहेत. या अपघाताने मोहोळ तालुका हादरून गेला आहे. या अपघातात चार जण जखमी झाले असून जखमीत पंढरपूर तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. 


पंढरपूर मोहोळ हा रस्ता अलीकडे मृत्यूचा महामार्ग बनू लागला असून सतत छोटे मोठे अपघात या रस्त्यावर होत आहेत. आज पुन्हा एक अत्यंत भीषण असा अपघात झाला आहे. युनोव्हा आणि स्कार्पिओ यांच्यातील या अपघातात डॉक्टर पतीपत्नीसह त्यांची एक मुलगी आणि त्यांच्याच नात्यातील आणखी एक पती पत्नी आणि त्यांचा मुलगा असे मिळून सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची थरारक घटना घडली आहे. पंढरपूर - मोहोळ रस्त्यावर पेनूर जवळ असलेल्या माळी पाटीजवळ हा अपघात झाला असून दोन्ही वाहनांची समोरासमोर जोराची धडक झाली आणि  वाहनांचा तर अक्षरश: चक्काचूर झाला आहे. 


मोहोळ येथील डॉक्टर श्रीमती आफरीन खान - आतार आणि त्यांचे पती मुजाहिद इमाम आतार, मुलगा अरमान आतार (वय ५) यांच्यासोबत डॉ. अफरीन खान आतार यांचे भाऊ आणि  नातेवाईक आपल्या गाडीने (एम एच १३ डी टी ८७०१) परगावी गेले होते. आज ते परत मोहोळ येथे जात असताना पेनूरजवळ अपघाताची घटना घडली. मोहोळ कडून पंढरपूरकडे येत असलेली स्कार्पिओ (एम एच १३ डी इ १२४२) समोरून धडकली.  ही धडक एवढी जोराची होती की वाहनाचा चक्काचूर झाला आणि एकूण सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 


सहा जण ठार 
अत्यंत भीषण अशा या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. डॉ अफरीन खान, त्यांचे पती मुजाहिद आतार, त्यांचा मुलगा अरमान, इरफान खान, त्यांची पत्नी बेनझीर इरफान खान आणि त्यांची मुलगी अनाया इरफान खान यांचा मृतात समावेश आहे. हे सर्व एकाच गाडीत मोहोळ येथे निघालेले होते. 


 जखमी अत्यवस्थ 
सदर अपघातात एकूण चार जण जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील अनिल हुंडेकरी आणि मनीषा मोहन हुंडेकरी तसेच मोहोळ येथील अर्हान इरफान खान आदी जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. 



हे जरूर वाचा : >>> 

खालील बातमीला टच करा !


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !    

    




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !