जळगाव : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचे जळगाव येथे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले असून त्यांच्या स्वागतासाठी तब्बल चार क्विंटल वजनाचा ५० फुटाचा पुष्पहार तयार करण्यात आला होता.
आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी कार्यकर्ते सतत वेगळे काहीतरी करू इच्छित असतात आणि नवनव्या पद्धतीने नेत्यांचे स्वागत करीत असतात. शरद पवार हे तर देशाचे नेते असून महाराष्ट्रात त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारे अगणित लोक आहेत. कार्यकर्ते तर पवार यांच्यावर जीव ओवाळून टाकतात. असाच एक प्रकार जळगाव येथे पाहायला मिळाला असून आपल्या लाडक्या नेत्यांचे स्वागत करण्यासाठी जळगाव येथे अभूतपूर्व पुष्पहार बनविण्यात आला. शरद पवार हे आज जळगाव दौऱ्यावर असून त्यांचे जळगावात आगमन झाले तेंव्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने त्यांचे एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. चार क्विंटल वजनाचा एक पुष्पहार घालून हे स्वागत अनेकांनी डोळा भरून पहिले.
शरद पवार हे आज धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे माजी आमदार मुगम पवार यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी जळगाव येथे आले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयाजवळ त्यांचे अत्यंत उत्साहात आणि जोशपूर्ण स्वागत करण्यात आले. ढोल ताशाच्या गजरात गुलाबांच्या पाकळ्यांची उधळण करीत आणि घोषणा देत पवारांचे स्वागत तर झालेच पण चार क्विंटल वजनाचा फुलांचा हार शरद पवार यांना अर्पण करून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. शरद पवार हे तब्बल दोन वर्षांनी जळगाव जिल्ह्यात आले आहेत त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी असा अभूतपूर्व पुष्पहार तयार करण्यात आला होता आणि हा वजनदार हार एका क्रेनच्या सहाय्याने उचलून पवार यांचे स्वागत करण्यात आले. अशा वेगळ्या स्वागताची चर्चा राज्यभर होऊ लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !