परभणी : जितुर शहरात राज्य परिवहन महामंडळाच्या धावत्या एस टी च्या चालकाला अचानक चक्कर आली आणि ही बस अनेक दुचाकीना ठोकरत एका झाडावर जाऊन आदळली. (Bus Accident) सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.
प्रवासी वाहनाच्या चालकाच्या भरोशावर प्रवाशांचे जीव असतात त्यामुळे अचानक चालकाला काही झाले तर प्रवाशांचे प्राण संकटात येत असतात. चालू वाहनात चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याची उदाहरणे देखील घडली आहेत पण चालकाने अशावेळीही प्रसंगावधान राखून वाहन थांबवून प्रवाशांचे प्राण वाचविले असल्याच्या घटना घडल्या आहेत. आज मात्र चालकाला चक्कर आल्याने एस टी बस चा अपघात झाल्याची घटना घडली पण सुदैवाने जीवितहानी झाली नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ही बस कळमनुरी येथून जिंतूरला येत होती. ही बस जितुर शहरात आल्यानंतर अपघाताची (Accident due to dizziness of the driver of the running bus) ही घटना घडली आहे.
राज्य परिवहन महामंडळाची बस एम एच १३ सी यु ७५४३ ही जिंतूर शहरात आल्यानंतर बस चालकाला अचानक भोवळ आली आणि त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. शहरातून बस जात असल्यामुळे आजूबाजूला लोकांची वर्दळ होती आणि रस्त्याच्या कडेला अनेक दुचाकी वाहने उभी केलेली होती. या दुचाकी वाहनांना ठोकरत बस पुढे गेली आणि सरळ जाऊन बाजूच्या एका झाडावर आदळली. झाडावर जावून धडकल्यावर ही बस जागीच थांबली. या दरम्यान प्रवाशांत प्रचंड घबराट निर्माण झाली होती. अचानक काय घडतेय हेच कुणाच्या लक्षात येत नव्हते.
चालक जखमी
चालकाला अचानक चक्कर आल्याने काही कळायच्या आत हे सगळे घडून गेले आणि बस जाऊन झाडावर आदळली यामुळे चालकाच्या डोक्याला मार लागला आहे. बसमधील काही प्रवाशी देखील किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.
वाहनांचे नुकसान !
धावती बस रस्त्याकडेच्या उभ्या दुचाकी आणि चार चाकी वाहनांना ठोकर मारीत पुढे गेल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. यातील एक दुचाकी तर एस टी च्या टायरखाली आली. या घटनेत एकूण दहा दुचाकी आणि दोन कारचे मोठे नुकसान झाले आहे.
डोके गरगरले !
रुग्णालयात दाखल केलेल्या बस चालकाला काहींनी विचारले असता, 'चक्कर आली नव्हती पण डोक्यात अचानक गरगरल्यासारखे झाले आणि त्यानंतर पुढे काय झाले ते काही कळालेच नाही' असे बस चालकाने सांगितले. भर शहरात ही घटना घडल्याने घटनेवेळी प्रचंड गोंधळ उडाला आणि नंतर नागरिकांनी येथे एकच गर्दी केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !