BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ एप्रि, २०२२

रेड्यांची टक्कर : पंढरपूर तालुक्यात यात्रा कमिटीवर गुन्हा !



पंढरपूर : रेड्यांची टक्कर लावल्याप्रकरणी तालुक्यातील उपरी येथील यात्रा कमिटीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यु ट्यूबवर व्हिडीओ अपलोड झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. (Pandharpur Crime) प्राणीमित्राने केलेल्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मनोरंजन करण्यासाठी प्राण्याचा छळ करण्यास कायद्यानुसार मनाई आहे पण तरीही असे प्रकार घडताना अनेकदा दिसतात. असा प्रकार केल्यास तो कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे उपरी येथे रेड्याच्या झुंजी लावल्याची तक्रार आल्याने गुन्हा दाखल झाला आहे. यु ट्यूबवर रेड्यांची टक्कर लावल्याचे काही व्हिडीओ अपलोड करण्यात आलेले होते ते व्हिडीओ प्राणीमित्र जितेंद्र कोळेकर यांच्या पाहण्यात आले. त्यांनी सदर व्हिडीओ आणि रेड्यांची टक्कर याबाबत अधिक माहिती मिळवली असता पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे अशा शर्यती झाल्या असल्याची माहिती त्यांना मिळाली. 


प्राणीमित्र कोळेकर यांनी याबाबत अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना रेड्याच्या झुंजीबाबत सोशल मीडियावर देखील काही मजकूर मिळाला. उपरी, ता. पंढरपूर येथे ३ एप्रिल रोजी रेड्यांच्या भव्य टकरी आयोजित केल्याची एक पोस्ट त्यांना सोशल मीडियावर पाहायला मिळाली 'टकरीशिवाय रेडा आणू नये, मानधन मिळणार नाही' असे देखील या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले होते. शिवाय काही लोकांची नावे देखील या पोस्टमध्ये आहेत. हा एकूण सर्व प्रकार कायद्यानुसार गुन्हा ठरत असल्याने प्राणीमित्र कोळेकर यांनी व्हिडीओ आणि सोशल मीडियावरील पोस्ट इ मेल द्वारे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पाठवली. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे देखील  याबाबत तक्रार करण्यात आली होती.

 

सदर तक्रार प्राप्त होताच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पशुसंवर्धन विभागाच्या निदर्शनास आणून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पशुधन विकास अधिकारी प्रवीण खंडागळे यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Torture of animals for entertainment) रेड्याच्या टकरी आयोजित करणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत.  


हे देखील वाचा : 


 अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !