BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ एप्रि, २०२२

शिवसेना नेत्यांच्या खिशातील बंडल चोरणारा निघाला सांगोल्याचा चोर !

 


सांगली : महाराष्ट्रात चर्चा झालेला, मंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या खिशातून पैशाचे बंडल चोरून पसार झालेल्या चोरट्याचा पोलिसांनी शोध लावला (Sangali Theft) असून हा बहाद्दर चोर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील असल्याचे समोर आले आहे.


ओबीसी नेते विजय वडेट्टीवार ( Vijay Vadettiwar) यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री वडेट्टीवार हे व्यासपीठावर असतानाच शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्या खिशातून पन्नास हज्रार रुपयांचा बंडल एका चोराने अलगद काढून घेतला होता. खिशातून पैसे काढून झाल्यावर हा चोर तेथून लगेच पसार देखील झाला होता परंतु चोराचे दुर्दैव आड आले आणि ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात चित्रित झाली होती. मंत्र्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमात थेट व्यासपीठावर जाऊन खिसा मारण्याचे चोराने धाडस केल्याने या घटनेची मोठी चर्चाही झाली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरु केली होती.  


जोराने जेवढ्या कल्पकतेने शिवसेना जिल्हाप्रमुख विभुते यांच्या खिशात हात घालून पन्नास हजाराचे  बंडल लांबवले होते तेवढ्याच कल्पकतेने मिरज पोलिसांनी तपास केला आणि आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला गजाआड केला.  सांगलीच्या कार्यक्रमात व्यासपीठावर जाऊन चोरी करणारा हा बहाद्दर चोर सांगलीचा नसून तो सोलापूर जिल्हयातील सांगोला येथील असल्याचे समोर आले आहे.  अवघ्या २३ वर्षाचे वय असलेल्या या आरोपीचे नाव स्वप्नील घुले असून तो सांगोला येथील रहिवाशी आहे.  स्वप्नील घुले हा सराईत चोर असून त्याच्यावर या आधी देखील असे गुन्हे दाखल आहेत. (Theft on stage, Sangola accused arrested) राजकीय कर्यक्रमात घुसून तो अशा प्रकारच्या चोऱ्या अत्यंत सफाईदारपणे करतो. 


सांगली पोलिसांच्या स्वाधीन !

मिरज पोलिसांनी सांगोल्याच्या या स्वप्नील घुले (Sanglola, Solapur) याच्या मुसक्या आवळून त्याला सांगली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्याने शिवसेना पदाधिकारी यांच्या खिशातून पन्नास हजार रुपये लंपास केले होते त्यातील ४३ हजार रुपये पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केले आहेत. मेळाव्यात चोरी करण्याच्या उद्देशानेच तो सांगोल्यातून सांगलीत पोहोचला होता.  


हे देखील वाचा :



 ------------------------------

खास गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तानिमित्त शेतकरी बांधवासाठी खास ऑफर ! ट्रॅक्टरसोबत ब्लोअर चक्क मोफत ! अर्थात ऑफर फक्त काही दिवसांपुरतीच !!
   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !