सातारा: वर्षापूर्वी झालेल्या वाळू उपसा प्रकरणातून महाराष्ट नवनिर्माण सेनेच्या तरुण माजी तालुकाप्रमुखाचे हात पाय तोडून खून करण्यात आल्याचा प्रकार घडला असून यामुळे सातारा जिल्ह्यात तर खळबळ उडाली आहेच (MNS former taluka chief) पण अमानुषपणे केलेल्या खुनामुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथे ही थरारक घटना घडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुकाध्यक्ष वैभव विकास ढाणे (वय २८, रा. जळगाव , ता. कोरेगाव) यांचे हातपाय तोडून खून करण्यात आला. या घटनेत तलवार, कोयता आणि अन्य धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील वर्षी वाळू काढण्याच्या वादातून खुनी हल्ल्याचा प्रकार घडलेला होता, त्याच रागातून वैभव ढाणे यांच्यावर हा हल्ला झाला आणि यात त्यांचा मृत्यू झाला आहे . या घटनेने जळगाव येथे प्रचंड तणाव निर्माण झाला आणि पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला.
नदीच्या पात्रातून वाळू उचलण्याबाबत मयत वैभव आणि प्रशांत भोसले यांच्यात वाद होता. यातूनच त्यांच्यात नेहमीच तणाव निर्माण होत होता. मागील वर्षी वैभव ढाणे, विजय शिवाजी जाधव, निलेश विठ्ठल पवार यांनी प्रशांत भोसले याच्यावर चाकूने वार केलेले होते. या घटनेत प्रशांत गंभीर जखमी झालेला होता. त्यानंतर वैभव आणि अन्य तिघांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळू उचलण्यावरून सुरु असलेला आपसातील वाद या घटनेने अधिक वाढत राहिला. या वादाचे पर्यावसान वैभवच्या थरारक (Brutal murder) खुनात झाले. वैभवचा खून झाल्याचे समजताच गावात आणि तालुक्यात देखील तणावाचे वातावरण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस धावत घटनास्थळी गेले आणि तणावाची परिस्थिती पाहून बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली.
डोळ्यादेखत खून !
घटनेपूर्वी वैभव हा पिकांना पाणी देण्यासाठी भाऊ शुभम याच्यासह आपल्या शेतात जाणार होता. शुभम तंबाखू आणण्यासाठी म्हणून बाहेर गेला आणि तेवढ्यात वैभव चालत चालत भैरोबा मंदिराकडे गेला. शुभम गेला तिकडेच मित्रांसमवेत गप्पा मारत थांबला त्यामुळे त्याला परत यायला उशीर झाला. घरी वैभव नाही म्हटल्यावर शुभम हा दुचाकीवरून मंदिराकडे गेला. समोर त्याला अत्यंत धक्कादायक चित्र दिसले. प्रशांत भोसले, सौरभ भोसले, किरण भोसले, हुसेन बेग, मनोज शिरतोडे, रोहन भोसले हे तलवार, कोयता आई धारदार शस्त्राने वैभववर वार करीत असल्याचे त्याने पहिले. ( Murder of former MNS taluka chief) शुभम आल्याचे पाहताच हल्लेखोर पळून गेले.
थरारक प्रकार !
वैभव ढाणे हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, शुभम याने नातेवाईकांच्या मदतीने सातारा येथील शासकीय रुग्णालयात वैभवला नेले परंतु वैभवचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हल्लेखोरावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कोरेगाव तालुका आणि सातारा जिल्हा या घटनेने हादरून गेला आहे. वाळू उचलण्याच्या वादातून तरुण वैभवचा जीव गेला असून ज्या पद्धतीने त्याला मारण्यात आले तो प्रकार अत्यंत धक्कादायक आणि थरारक असल्याचे समोर आले आहे. वैभव याचे हात आणि पाय तोडण्यात आले आणि त्याचा खून करण्यात आला आहे.
राजकारणात सक्रीय !
मयत वैभव हा राजकारण आणि समाजकारण यात सतत सक्रीय तर होताच पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्षपद देखील त्याने सांभाळले होते. शेतकरी कुटुंबातील वैभव याला राजकारणात विशेष रस होता आणि मनसेच्या स्थापनेपासून तो मनसेसोबत होता. शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली त्यावेळी वैभव याने तालुकाध्यक्षपद सांभाळले होते. मनसेच्या प्रत्येक आंदोलनात तो अग्रभागी होता .
हे देखील वाचा :
------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !