नवी दिल्ली : अजूनही अच्छे दिन येण्याची स्वप्नं पहात असलेल्या सामान्य नागरिकांना महागाईचे चटके रोज बसत असताना नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईची जोरदार लाथ ( Inflation soared) बसली असून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल २५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
काँग्रेस शासनाच्या काळात काही पैशाने पेट्रोल, डीझेल महाग झाले की जोरजोराने शंख केला जात होता, दोन पाच रुपयांनी गॅस सिलिंडर महागला की आकांड तांडव केला जात होता. महागाई कमी करण्याची आणि अच्छे दिन आणण्याची स्वप्ने दाखवून केंद्रात सत्ता मिळविलेल्या भाजपचा (BJP) महागाईचा देखील एक 'जुमला" च होता याचा अनुभव सामान्य लोक घेताना दिसत आहेत. पंधरा लाख रुपये खात्यात जमा होण्याची आशा तर आता मावळली आहेच पण कथित अच्छे दिन कधीच येणार नाहीत याची देखील जाणीव सामान्य माणसाला आता होत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीचा परिणाम प्रत्येक वस्तू महाग होण्यात होतो पण सतत आणि विक्रमी दरवाढ गेल्या काही वर्षात सुरु आहे, गॅस सतत महाग होत असल्याने गरिबांच्या घरात चुली पेटू लागल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच घरगुती गॅस सिलिंडर दरात वाढ केल्यानंतर आज १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात तब्बल २५० रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. ही वाढ घरगुती सिलिंडरवर नसली तरी याची झळ सामान्य नागरिकांनाच बसत असते. व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात वाढ झाली की व्यावसायिक त्यांच्या पदार्थाच्या किमती वाढवून सामान्य ग्राहकाकडून या दरवाढीची वसुली करीत असतात. त्यामुळे सामान्य नागरिकांना दोन्ही बाजूनी आणि तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावाच लागत आहे. आजपासून ही दरवाढ लागू झाली असून आता प्रत्येक सिलिंडरसाठी २५० रुपये जादा द्यावे लागणार आहेत.
आजपासून लागू करण्यात आलेल्या या नव्या दरवाढीमुळे मुंबईत या सिलिंडरचा दर २ हजार २०५ वर गेला आहे. कोलकाता येथे २ हजार ३५१, चेन्नईत २ हजार ४०६ रुपये एका सिलिंडरसाठी मोजावे लागणार आहेत. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आगडोंब उसळला असून गेल्या काही दिवसांपासून रोज या किमती वाढत आहेत. पाच राज्यातील निवडणुकामुळे दाबून ठेवलेले दर आता उसळून बाहेर येऊ लागले आहेत. गॅस सिलिंडर देखील ( Gas cylinders became more expensive again ) अशाच दराचा भडका करू लागले असून महागाईची प्रचंड झळ सोसण्याची तयारी यापुढे ठेवावी लागणार आहे.
हे देखील वाचा :
------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !