BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ एप्रि, २०२२

सलाम ! लोकांचे जीव वाचविण्यासाठी महिलेने सोडली साडी !

 



लखनऊ : एका अशिक्षित महिलेने रेल्वेचा रूळ तुटलेला पहिला आणि क्षणाचाही विलंब न करता तिने राखलेल्या प्रसंघावधानाने रेलेवेची मोठी दुर्घटना (Railway Accident) टळलीच पण अनेक प्रवाशांचे प्राण वाचल्याची विस्मयकारक घटना घडली आहे.   



अशिक्षित, शेतात काम करणारी महिला देखील वेळप्रसंगी काय करू शकते हे या घटनेने समोर आले आहे. ग्रामीण भागातील महिला डोक्यावरच पदर बाजूला जाऊ देत नाहीत, अन्य कशापेक्षाही अधिक महत्व साडी आणि साडीच्या पदराला दिले जाते. महिला अशिक्षित असल्या तरी याबाबतीत प्रचंड जागरूक आणि दक्ष असतात. असे असतानाही लोकांचे जीव वाचविण्याची वेळ आली तेंव्हा एका अशिक्षित शेतकरी महिलेने अंगावरच्या साडीचा विचार केला नाही. कुणीही सलाम करावा असेच काम गुलारिया गावातील शेतकरी महिला ओमवती यांनी केले आहे आणि देशभर त्यांचे कौतुक होऊ लागले आहे. (Woman removig saari for avoid Train Accident) समाज माध्यमावर त्यांना सलाम केला जात आहे. 



गुलारीया गावातील शेतकरी महिला ओमवती या आपल्या शेताकडे निघालेल्या असताना रूळ ओलांडून पुढे जाताना त्यांचे लक्ष रेल्वेच्या रूळाकडे गेले आणि त्यांना धक्काच बसला. रेल्वेचा एक रूळ तुटलेला होता आणि यावरून रेल्वे जाताना रेल्वेची दुर्घटना घडणार हे त्यांना स्पष्ट दिसत होते. अचानक पाहिलेल्या या प्रकाराने त्यांना धक्का बसला असला तरी त्या दुर्लक्ष करून पुढे निघून गेल्या नाहीत तर त्यांनी होणारा अपघात रोखण्याचा विचार केला.  रूळ तर तुटलेला होता आणि रेल्वे येण्याची वेळ देखील झाली होती. अवागढच्या दिशेने जाणारी रेल्वे काही क्षणात येणार होती. काहीही करून रेल्वे थांबवली पाहिजे अन्यथा अनेकांचे जीव जातील हे या ओमवतीला डोळ्यापुढे दिसत होते. 



अंगावरची साडी सोडली !
लाल रंगाच्या झेंडा दाखवला तर रल्वे थांबते हे या महिलेने ऐकलेले होते ते तिच्या लक्षात आले. योगायोगाने या महिलेने लाल रंगाची साडी परिधान केली होती. कसलाही विचार न करता या महिलेने आपल्या अंगावरील साडी काढली. बाजूला पडलेल्या लाकडांच्या मदतीने तिने आपली लाल रंगाची साडी दोन रुळांच्या मध्ये बांधून उभी केली. दरम्यान काही क्षणात एटा रेल्वे स्टेशनवरून सुटलेली रेल्वे वेगात आली.  रेल्वेला पाहून ओमवती  हातवारे करून रेल्वेला थांबण्याचे इशारे करू लागली. रेल्वे रुळावर मधोमध लाल कापड बांधलेले रेल्वेच्या मोटारमनने पहिले आणि त्यांनी रेल्वेचा वेग कमी केला. बाजूला एक महिला हातवारे करीत रेल्वे थांबविण्याचा इशारा करीत असल्याचेही त्याच्या लक्षात आले. 

आणि रेल्वे थांबली !
समोरची एकूण परिस्थिती पाहून मोटारमनला काही अंदाज आला. काहीतरी संकटाची परिस्थिती असल्याची त्याला जाणीव झाली आणि त्याने प्रवासी रेल्वे थांबवली. त्याने या महिलेकडे चौकशी केली असता समोर रेल्वेचा रूळ तुटला असल्याची माहिती या महिलेने त्याला दिली. त्याने पाहणी केली असता धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. रेल्वेची दुर्घटना झालीच असती अशी रुळाची परिस्थिती होती पण एका शेतकरी महिलेने प्रसंगावधान राखले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती. (Woman rescues train accident) मोटारमनने या महिलेचे तोंडभरून कौतुक केले आणि तिला काही बक्षीस देखील दिले.  

योग्य वाटलं ते केलं !
महिलेच्या या बुद्धिमान आणि धाडसी पावलाचे कौतुक होत असताना ओमवती म्हणाल्या, 'लाल रंग धोक्याचा असतो हे माहित होतं आणि रेल्वेला लाल रंगाचा झेंडा दाखवल्यावर रेल्वे थांबते हे देखील गावातील लोक बोलताना कधीतरी ऐकलेले  होते. योगायोगाने माझ्या अंगावर लाल रंगाचीच साडी होती. त्यामुळे मी क्षणाचाही विचार न करता हे केले. त्या क्षणी मला जे योग्य वाटले ते मी केले !'  


आणखी बातम्यासाठी येथे क्लिक करा !    

 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !