BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० एप्रि, २०२२

बारा वर्षाच्या पोराने केला तरुणाचा खून !




नागपूर : गेल्या काही वर्षांपासून हिंसाचाराच्या घटना वाढीला लागलेल्या दिसत असल्या तरी बारा वर्षाच्या एका अल्पवयीन पोराने  चक्क सत्तावीस वर्षाच्या तरुणाचा खून केल्याच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. 


गेल्या काही वर्षात मारामारी, खून अशा घटना किरकोळ होऊ लागल्याचे दिसत आहे. माणसांच्या जीवाचे मोल उरले नसून किरकोळ कारणासाठी देखील हत्या करण्यात येत आहे. नातेसंबंधात देखील हत्येच्या घटना घडत असून मुलगा वृद्ध पित्याचा जीव घेत आहे तर जन्मदात्या आईवर सपासप वार करताना देखील त्याचे हात कापताना दिसत नाहीत. कुणाचा खून करणे ही एक सामान्य बाब काही लोकांना वाटू लागली आहे त्यात खाजगी वाहिन्यावरून आणि चित्रपटातून दाखविल्या जाणाऱ्या अनेक हिंसक दृश्याचा देखील गुन्हेगारी वाढीस लागण्यावर परिणाम होताना दिसत आहे. नागपुरात चक्क एक बारा वर्षाच्या मुलाने चाकूने वार करीत तरुणाचा खून केला आहे. रक्त पहिले तरी चक्कर येण्याच्या वयात या पोराने  आपल्यापेक्षा कितीतरी मोठे वय असलेल्या तरुणाला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 


सत्तावीस वर्षे वयाचा तरुण राहुल श्रावण गायकवाड आणि बारा वर्षे वयाचा एक मुलगा एका विवाह सोहळ्यास गेले होते. अनेकांच्या सोबत हे दोघेही या लग्नात नाचत होते आणि नाचता नाचता दोघात वाद झाला. या वादात बारा वर्षांचा मुलगा एवढा संतापला की, या छोट्या मुलाने सत्तावीस वर्षे तरुणाच्या छातीवर थेट चाकूने वार करण्यास सुरुवात केली. हातात पेन असण्याच्या या वयात या मुलाने चाकू चालवायला सुरुवात केली. त्याने अचानक आपल्यापेक्षा मोठ्यावर चाकूचे वार छातीवर केल्याने या तरुणाचा मृत्यू झाला आणि लग्नातील प्रत्येकजण स्तब्ध झाला. (The murder of a young man by a minor boy) अचानक या छोट्या मुलाजवळ चाकू कसा ? हा प्रश्नही तेवढाच विचारात टाकणारा ठरला आहे. 


धक्कादायक 
लग्नात नाचताना एवढ्या लहान मुलाने संतापाने आणि थेट चाकूने आपल्यापेक्षा मोठ्या आणि तरुणावर हल्ला करून त्याचा खून करणे हा सगळाच प्रकार सगळ्यांसाठीच धक्कादायक ठरला आहे. लग्नात नाचता नाचता एवढ्या लहान मुलाकडे चाकू आला कुठून ? हा मुलगा कायम चाकू बाळगून रहात होता काय ? एवढ्या लहान वयात चाकूने हल्ला करण्याचे धाडस त्याच्याकडे कसे आले ? हे सगळेच धक्कादायक असून या घटनेने चिंता निर्माण केली आहे. 


हे देखील वाचा .. खालील बातमीला टच करा !

  अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !