अकोला : राज्यात सगळीकडे वाळू तस्करांचा धिंगाणा सुरु असताना एका वाळू व्यावसायिकाला हप्ता मागणाऱ्या लाचखोर तहसीलदाराला बेड्या ठोकण्यात आल्या असून लाच घेताना रंगेहात सापडल्यानंतर (acb) अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आणि महसूल विभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या जाळ्यात सापडत आहेत तरीही लाचखोरीची प्रवृत्ती कमी होताना दिसत नसून शिपायापासून बड्या अधिकाऱ्यापर्यंत अनेकजण लाच प्रकरणात तुरुंगात जाऊन बसले आहेत. अधिकारी पदावर मोठा पगार घेत असताना देखील लाचखोरीच्या पैशाशिवाय यांची भूक भागत नाही आणि मग तुरुंगाचा प्रवास करीत 'सरकारी पाहुणचार' घेण्याची वेळ येते. वाळू तस्करी आणि लाचखोरी याबाबत तर आता सर्वसामान्य जनतेच्याही सर्वकाही लक्षात आलेले असून कुणाच्या संगनमताने वाळू माफियांचा धुडगूस सुरु आहे हे आता कुणी कुणाला सांगण्याची आवश्यकता उरलेली नाही. अशाच परिस्थितीत अकोट येथील तहसीलदार हरीश गुरव लाच घेताना रंगेहात सापडला आणि गजाच्या आड जाऊन बसला आहे.
वाळू तस्करांवर कडक कारवाई करणारा आणि वाळू माफियांचा घाम फोडणारा अधिकारी म्हणून नायब तहसीलदार हरीश गुरव याची ओळख आहे आणि हाच अधिकारी वाळू व्यावसायिकाकडून लाच घेताना रंगेहात जाळ्यात अडकला आहे. वाळूचा व्यवसाय नियमित चालू ठेवण्यासाठी तहसीलदार याने हप्त्याची मागणी केली होती. दहा हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी तहसीलदार याने केली पण दोघात तडजोड होऊन आठ हजाराचा हप्ता देणे निश्चित करण्यात आला. तक्रारदार हा नियमानुसार वाळूचा व्यवसाय करीत होता त्यामुळे हप्ता देणे त्यांना मान्य नव्हते. तरीही कारवाई करण्याची धमकी देत तहसीलदार गुरव हा हप्ता मागत होता. (tahasildar arrested in bribery case by Anti corruption) हप्ता दिल्यास कसल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही अशी ग्वाही देखील तहसीलदार गुरव याने दिली होती.
आणि तो सापडला !
नियमानुसार व्यवसाय करीत असतानाही हप्त्याची मागणी केली जात असल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली आणि सापळा लावला. ठरल्याप्रमाणे तहसीलादार गुरव याने आठ हजार रुपयांचा हप्ता (Bribe) स्वीकारला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहात पकडून तुरुंगात डांबले !
प्रभारी मुख्याधिकारी !
तहसीलदार हरीश गुरव याच्याकडे अकोट नगरपालिकेचाही कार्यभार आहे. त्यामुळे तो नगपालिका कार्यालयात असताना त्याने लाच स्वीकारली आणि तेथूनच त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेऊन अटक केली. या घटनेने महसूल आणि नगरपालिका कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे.
हे देखील वाचा .. खालील बातमीला टच करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !