BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ एप्रि, २०२२

खून केल्याच्या आरोपातून चौघांची मुक्तता !



पंढरपूर : तालुक्यातील आढीव-विसावा येथील तरुणाच्या खून प्रकरणी पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने (Pandharapur Court) चौघांची निर्दोष मुक्तता केली आहे. 


पंढरपूर तालुक्यातील आढीव - विसावा येथील योगेश धनाजी दरगुडे याचा जून २०१९ मध्ये खून झाल्याचा गुन्हा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. योगेश दरगुडे याचा मृतदेह त्याच्याच राहत्या घरात आढळून आला होता. याप्रकरणी माढा तालुक्यातील तुकाराम तांबवे, श्रीपूर, ता. माळशिरस येथील राजू दरगुडे, आढीव- विसावा येथील तानाजी दरगुडे आणि पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे येथील आजिनाथ दाईंगडे या चौघांच्या विरोधात पोलिसात खुनाचा गुन्हा (Murder Case) दाखल करण्यात आला होता. अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणासाठी योगेश दरगुडे याचा खून झाल्याची फिर्याद मयत योगेशने वडील धनाजी दरगुडे यांनी दिली होती आणि तपासात सदर नावे निष्पन्न करण्यात आली होती. 


पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात आरोपींच्या विरोधात दोषारोप पत्र सादर केले होते. या खटल्याची सुनावणी पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. सुनावणी दरम्यान एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. (Four accused of murder Innocent free) सदर खटल्यात चारही आरोपीना जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एम. बी. लंबे यांनी निर्दोष मुक्त केले आहे.   


हे देखील वाचा : >>




 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !