मोहोळ : जीपने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. (Accident Moohl) मोहोळ येथे आज एकाचा दिवशी तीन घटनात तिघांचा मृत्यू झाला आहे.
पुणे सोलापूर महामार्गावर मोहोळ परिसरात अपघाताच्या घटना नेहमीच घडू लागली असून आज शहरापासून जवळच एक अपघात झाला आणि यात एकाचा मृत्यू झाला आहे. निरंकारी मंडळाच्या कंपाउंडच्या जवळच पेट्रोल पंपावरून जाताना अपघाताची ही घटना घडली आहे. मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील दत्तात्रय रामचंद्र शिवपूजे आणि नागनाथ गंगाधर शिवपूजे हे दुचाकीवरून (एम एच १३ डी डब्ल्यू ३४९२) जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एक जीपने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. या धडकेने दुचाकीवरील दोघेही रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडले. यावेळी दत्तात्रय शिवपूजे यांना जोराचा मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. (Accident at Mohol on Solapur Pune Highway) त्यांच्यासोबत असलेले नागनाथ शिवपूजे हे जखमी झाले असून त्यांना मोहोळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोघांचा गळफास !
अपघातात एकाचा मृत्यू झाला असतानाच मोहोळ तालुक्यात आज आत्महत्येच्या दोन घटना (Suicide in Mohol) घडल्या आहेत. मोहोळ येथील ७० वर्षे वयाच्या तानाजी दगडू केवळे यांनी दारूच्या नशेत राहत्या घरीच काथ्याच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली असून याबाबत प्रकार दगडू केवळे यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली आहे. दुसऱ्या आत्महत्येची घटना मोहोळ तालुक्यातील खंडोबाची वाडी येथे घडली. ५५ वर्षीय विमल दत्तात्रय शेळके या महिलेने राहत्या घरीच दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !