BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ एप्रि, २०२२

प्रख्यात किर्तनकार महाराजांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल !

 


औरंगाबाद : प्रसिद्ध किर्तनकार महाराजाचा कीर्तनकार महिलेसोबतच्या अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे वारकरीवर्गात आणि भक्तात प्रचंड खळबळ उडालेली असतानाच बदनामीच्या भीतीने कीर्तनकार महिलेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. 


कीर्तनकार महाराजांना मोठे महत्व आहे, कीर्तनकारांचे उपदेश ऐकण्यासाठी भाविक, वारकरी मोठी गर्दी करतात आणि महाराजांच्या आदेशाप्रमाणे आपले आचरण ठेवतात. राज्यात अनेक नामांकित कीर्तनकार असून त्यांच्या भक्तांची संख्या देखील राज्यभर पसरलेली आहे. कीर्तनकार महाराजांना मानाचे स्थान असते आणि त्यांचा आदर्श समाज घेत असतो. मोठ्या श्रद्धेने त्यांच्या पायावर नतमस्तक होत असतात. परंतु काही ढोंगी देखील कीर्तनकाराचा वेष पांघरून  कीर्तनकार, महाराज या शब्दांना देखील बदनाम करू पहातात. अशातच एका नामवंत कीर्तनकाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नामवंत कीर्तनकार पुरुष आणि प्रसिद्ध कीर्तनकार महिला यांच्यातील एक आक्षेपार्ह व्हिडीओ बाहेर आला आणि तो व्हायरल देखील झाला.


औरंगाबाद आणि राज्यात इतरत्र देखील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठीत किर्तनकार म्हणून परिचित असलेल्या एका महाराजाचा दुसऱ्या एका कीर्तनकार महिलेच्या सोबतचा शारीरिक संबंधाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि या महाराजांच्या भक्तात प्रचंड खळबळ उडाली आहे. सदर महाराज आणि व्हिडीओत दिसत असलेली महिला गेल्या अनेक वर्षांपासून किर्तन करून समाजाचे प्रबोधन करीत असतात, त्यांच्या भक्ताचा परिवार देखील मोठा असून यु ट्यूबवर त्यांचे असंख्य फॉलोअर आहेत. परंतु या व्हिडीओमुळे त्या सर्वांनाच धक्का बसला आहे. ( Kirtankar Maharaj's offensive video goes Viral) ज्याचा उपदेश ऐकण्यासाठी आपले कान तरसतात आणि ज्यांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी आपण धडपड करीत असतो त्या महाराजांच्या या लीला पाहून भक्त हादरले आहेत. 

 

कारवाईची मागणी !

या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. सदर किर्तनकार महाराज आणि महिला यांच्यावर कारवाई करण्याची मागणी छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी केली आहे.  व्हिडीओमधील दोघेही 'आनंद सांप्रदायिक' आहेत, त्यांच्या विचारसरणीला मानणाऱ्या समाजामध्ये त्यांनी कीर्तनकार म्हणून ख्याती मिळवली आहे. कीर्तनातून भक्तीसह समाजप्रबोधन करीत असतात त्यामुळे लाखो लोक त्यांना आपले आदर्श मानतात. या सर्व लोकांच्या धार्मिक भावनावर त्यांच्या वर्तनाने आघात झाला आहे. असभ्य वर्तणुकीचे अश्लील प्रदर्शन करून त्यांनी महाराष्ट्रातील लोकांच्या आस्था पायदळी तुडवल्या आहेत. असे आपल्या तक्रारीत ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी म्हटले आहे.  


महिलेने घेतले विष ! 

व्हिडीओमध्ये दिसत असलेले महाराज आणि महिला हे दोघेही प्रसिद्ध किर्तनकार असून त्यांच्या दोन व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. समाजमाध्यमावर लोक ही क्लिप पहात असल्याने बदनामीच्या भीतीने यातील महिलेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. वारकरी संप्रदायातून देखील प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे. चाळीस वर्षे वयाच्या महिला किर्तनकार या सिल्लोड तालुक्यातील असून ४८ वर्षीय कीर्तनकार हे वैजापूर तालुक्यातील आहेत. बदनामीच्या भीतीने किर्तनकार महिलेने विषप्राशन केले आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून महाराजावर देखील लक्ष ठेवण्यात येत आहे. 


 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !