BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ मार्च, २०२२

अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच राहणार !

 



पुणे : राज्यात अनेक जिल्ह्यात मोठे नुकसान केलेल्या अवकाळी पावसाचा धिंगाणा सुरूच राहणार असून सोलापूर जिल्ह्यासह १६ जिल्ह्यांना आज पुन्हा हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

गेल्या चार पाच दिवसांपासून राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार धिंगाणा घालत पिकांचे मोठे नुकसान केले असून अजूनही या अवकाळीच्या 'कळा' थांबायला तयार नाहीत. शेतकरी एकेका संकटात सापडत असताना निसर्गाचे संकटही गडद होताना दिसू लागले आहे. शेतकरी या पावसामुळे चिंतेत तर आहेच पण आधीच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे आता अधिक स्पष्ट दिसू लागली आहेत. अकाली पावसांच्या संकटामुळे रब्बी पिके धोक्यात आलेली असताना या पिकांचे जर अवकाळीने अधिक नुकसान केले तर शेतकरी मोठ्या अडचणीत सापडणार आहे. Yellow alert to sixteen districts for unseasonal rains )


उन्हाळ्याचा कडाका काही भागात वाढू लागला आहे तर काही भागात अवकाळी पावसाचे थैमान सुरु आहे. द्राक्षबागा अंतिम टप्प्यात आहेत तर रब्बी पिकांची काढणीची वेळ आलेली आहे. अशा परिस्थिती अवकाळी पाउस ( Non Seasonal rainfall )  आणि गारपीठ (hailstorm ) यामुळे शेतकरी पुरता कोलमडून पडण्याचा धोका आहे.  राज्यात आज देखील काही जिल्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून कोकण, घाट परिसर, मराठवाडा येथेही अवकाळी पावसाचा धिंगाणा आज देखील कायम असणार आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाची चिंता अधिकच वाढताना दिसत आहे. 

यलो अलर्ट !
राज्यातील १६ जिल्ह्यांना हवामान विभागाने आजच्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यात सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड परभणी, हिंगोली, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, औरंगाबाद, जालना या सोळा जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी ( Yellow alert ) करण्यात आला आहे. 

उद्यापासून जोर कमी !
गेल्या चार पाच दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस ( Untimely rain ) आणि गारपीठ होत असली आज देखील यलो अलर्ट देण्यात आला असला तरी उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.  पुढील चार दिवसासाठी हवामान विबह्गाने कोणताही इशारा दिलेला नाही. पुढील चार दिवस राज्यातील हवामान कोरडे राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. 

ढगाळ वातावरण !
गेल्या चार पाच दिवसांपासून वातावरणात बदल झालेला असून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे आजही ढगाळ हवामान आहे. शुक्रवारी रात्री सोलापूर, पुणे, चाकण परिसर येथे पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी मराठवाड्यात देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. सिंधुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, सोलापूर  (Solapur ) तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण होते आणि याच भागात पाऊस होण्याची तसेच वादळी वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.    



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !