शोध न्यूज : राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांना 'सेक्सटॉर्शन' मध्ये अडकविण्याचा डाव उघडकीस आला असून याप्रकरणी (Sextortion) एकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
तंत्रज्ञान विकसित होत असतानाच सायबर गुन्हेगारी वाढीस लागली असून वेगवेगळ्या प्रकाराने नागरिकांना लुटले जात आहे. दिवसाढवळ्या बँकेतील खाती रिकामी केली जात आहेत शिवाय अन्य प्रकारे मोठी फसवणूक केली जात असते. त्यातच सेक्सटॉर्शनचा प्रकार देखील सर्रास होऊ लागला असून मोहात अडकवून आधी व्हिडीओ प्राप्त करायचा आणि नंतर त्याच्या आधाराने बदनामीची धमकी देत खंडणी वसूल करण्याचे अनेक प्रकार सतत घडत असतात. असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांना गोत्यात आणण्याचा डाव आखण्यात आला होता (Conspiracy of 'Sextortion', Ncp Mla Yashawant Mane, Mohol)परंतु तो प्रकार हाणून पाडत पोलिसांनी एकाला भामट्याला बेड्या ठोकण्यात यश मी मिळवले आहे.
चित्रफीत आणि फोटो समाजमाध्यमावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत आमदार माने यांच्याकडून खंडणी उकळण्याचा मोठा प्रयत्न झाला पण पोलिसांनी राजस्थान येथून एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. आमदार माने हे पुण्यात वास्तव्याला आहेत. त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ कॉल केले आणि नंतर अश्लील व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी देत एक लाख रुपयांची खंडणी मागितली. सुरुवातीला कॉल करून अश्लील चित्रफीत दाखवली आणि नंतर आ. माने याना स्क्रीनशॉट पाठवून तो समाजमाध्यमावर व्हायरल कारण्याची धमकी देत रकमेची मागणी केली. आमदार माने यांनी याबाबत तात्काळ सायबर विभागाशी संपर्क साधला त्यामुळे या विभागाने लगेच याचा शोध सुरु केला.
सायबर विभागाच्या चौकशीत हा अज्ञात व्यक्ती राजस्थानमधील भरतपूर येथील असल्याचे आणि त्याने तेथून हे फोन केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या रिझवान अस्लम खान या २४ वर्षीय व्यक्तीला मोठ्या कौशल्याने राजस्थानमधून अटक करण्यात आली असून त्याच्याकडे बरेच काही आक्षेपार्ह साहित्य आढळून आले आहे. या आरोपीने तब्बल ८० लोकांना अशा प्रकारे फसविण्याचा प्रयत्न केला असून त्या सर्वाना अशा प्रकारचे फोन केले असल्याचे आढळून आले आहे. शिवाय त्याच्याकडे स्क्रीनरेकॉर्ड केलेले ९ व्हिडीओ देखील सापडले आहेत. त्याच्याकडून चार मोबाईल, चार सीमकार्डही हस्तगत करण्यात आली आहेत. अनेकांना त्याने खंडणीसाठी धमकावले असल्याचेही पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. पुणे सायबर विभागाने याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली असून अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास अथवा होत असल्यास सायबर विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !