BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ डिसें, २०२२

शाई फेकणाऱ्यास बक्षीस, बारामतीत राष्ट्रवादीच्या १४ जणांच्या विरोधात गुन्हा !

 


शोध न्यूज : भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यासाठी ५१ हजाराचे बक्षीस जाहीर केल्याप्रकरणी बारामतीत १४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


भारतीय जनता पक्षाचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर चिंचवड येथे शाई फेकून त्यांनी केलेल्या विधानांचा निषेध करण्यात आला होता. थोर राष्ट्रपुरुषांचा अवमान झाल्याचा आरोप करीत राज्यातून पाटील यांच्याविरोधात संताप व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यत भारतीय जनता पक्षातील नेत्याकडून सतत अवमानना होत असल्यामुळे राज्यातील वातावरण दुषित झाले आहे आणि त्यातच पुन्हा चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर आक्षेप घेण्यात आला आहे. राज्यभर वेगवेगळ्या पद्धारीने निषेध व्यक्त होत असतानाच चिंचवड येथे त्यांच्यावर शाईफेक करून निषेध करण्यात आला होता. तत्पूर्वी बारामतीत राष्ट्रवादीकडून ५१ हजाराचे बक्षीस घोषित करण्यात आले होते.

 
चंद्रकांत पाटील यांना काळे फासण्याचे काम जो कोणी करील त्याला ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल अशी घोषणा राष्ट्रवादीचे सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी केली होती. त्यानंतर पुण्यातील ही घटना घडली आहे. त्यामुळे चिथावणीखोर भाषण करणाऱ्या १४ राष्टवादी कार्यकर्त्यांच्या विरोधात बारामती येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाईफेक करणे योग्य नसल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जाहीरपणे सांगितले असले तरी चंद्रकांतदादा पाटील हे मात्र राष्ट्रवादीवर संतप्त असल्याचे दिसत आहे. दरम्यान पाटील यांच्या विरोधात राज्यातून निषेधाचे पडसाद उमटतच आहेत.


दरम्यान शाईफेक करणाऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून  यात भारतीय दंड संहिता कलम ३०७ चा देखील अंतर्भाव करण्यात आला आहे. या गुन्ह्यात लावलेल्या कलमामुळे पुन्हा नवा वाद निर्माण झाला असून शासकीय यंत्रणेचा गैरवापर करण्यात येत असल्याची जोरदार टीका होताना दिसत आहे. (Reward for ink thrower, case registered in Baramati) प्राणघातक हल्ला करण्याचे हे कलम अयोग्य असून प्रसंगी आपण या कलामांच्या विरोधात न्यायालयात आरोपींच्या बाजूने विनामुल्य लढू असे  प्रसिद्ध वकील एड. असीम सरोदे यांनी देखील म्हटले आहे. शाई फेकण्याच्या कृतींचा त्यांनी निषेधच केला आहे पण लावण्यात आलेली कलमे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !