BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ मार्च, २०२२

अपघातातील जखमी दोन वारकरी महिलांचा मृत्यू !

 



सोलापूर : कोंडीजवळ झालेल्या भीषण अपघातातील आणखी दोन जखमी वारकरी महिलांचा मृत्यू झाला असून आता या अपघातातील (Solapur Accident) मृतांची संख्या सहावर पोहोचली आहे. 


आमलकी एकादशीच्या निमित्ताने तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी परिसरातील वारकरी दिंडी एका ट्रॅक्टर ट्रॉलीतून पंढरपूरकडे (Pandharpur Ekadashi) निघाली असताना सोलापूर- मोहोळ मार्गावर कोंडी गावाच्या हद्दीतील पुलाजवळ एका ट्रकने उडविल्याने अत्यंत भीषण स्वरूपाचा अपघात झाला होता. १३ मार्च रोजी झालेल्या या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला होता तर अनेक भाविक गंभीर जखमी झाले होते. यातील काही जखमींची प्रकृती चिंताजनक होती. या जखमीतील आणखी दोन वारकरी महिला उपचार घेताना मृत्युमुखी पडल्या असून या अपघातातील मृतांची संख्या सहा  झाली आहे. 


सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकने भाविकांच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली होती आणि जवळपास तीनशे फुटापर्यंत फरफटत नेले होते. ट्रॅक्टर भाड्याने घेऊन कदमवाडी आणि परिसरातील २३ वारकरी पंढरपूरकडे एकादशीनिमित्त निघालेले होते. राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी संपामुळे पंढरपूरला जाण्यासाठी त्यांनी हा पर्याय निवडला होता परंतु तो अनेकांच्या जीवावर उठला. अपघाताच्या ठिकाणी अनेकजण उडून पडले होते आणि जखमी झाले होते. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक पळून गेला  होता परंतु त्याला सावळेश्वर टोळ नाक्यावर पकडण्यात आले होते. या अपघाताने सोलापूर जिल्हा हादरला होता आणि वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याने प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात आली होती. (Two warkari women injured in accident die)


सदर अपघातातील मृतांची संख्या सहा वर गेली असून ज्ञानेश्वर दत्ता साळुंखे (वय १६), जशान मिसाळ (वय ६०), तुकाराम सुदाम शिंदे (वय २०), भागाबाई मिसाळ (वय ६०) हे चार जण अपघात झाला त्याच वेळी मृत्युमुखी पडले होते तर जखमीतील राखेल ता. तुळजापूर येथील जनाबाई फुलचंद घाडगे (वय ६८) आणि  कदमवाडी येथील सत्यभामा दिलीप मिसाळ (वय ४८) यांचा आज मृत्यू झाला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होऊ लागली आहे.


हे देखील वाचा :

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !