BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ मार्च, २०२२

आत्महत्या प्रकरणी महावितरणचे दोन वरिष्ठ अधिकारी निर्दोष !



सोलापूर : महावितरण उप कार्यकारी अभियंता यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणी दोन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 


महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत सोलापूर जिल्ह्यातील  मोहोळ येथे कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंता पंढरीनाथ पानसरे यांनी २९ डिसेंबर २०१६ रोजी आत्महत्या केली होती. त्यांच्या या आत्महत्येस कार्यकारी अभियंता बालाजी रामराव डुमणे, अधीक्षक अभियंता धनंजय रामभाऊ औंढेकर याना जबाबदार धरण्यात आले होते आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयासमोर झाली आणि न्यायालयाने या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. 


आत्महत्या केलेले विकास पानसरे हे मोहोळ येथील महावितरण विभागाकडे उप कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांचे कुटुंबीय पुणे येथे रहात होते. विकास पानसरे हे मोहोळ येथे त्यांचे सहकारी लक्ष्मीकांत जोंधळे यांच्यासोबत सुभाषनगर, मोहोळ येथेच रहात होते.  वरिष्ठ अधिकारी  कार्यकारी अभियंता बालाजी रामाराव डुमणे, अधीक्षक अभियंता धनंजय रामभाऊ औंढेकर यांच्याकडून मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे आणि त्या त्रासाला कंटाळून त्यांनी २९ डिसेंबर २०१६ रोजी आत्महत्या केली या आरोपावरून दोन्ही वरिष्ठ अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. उप कार्यकारी अभियंता पदावरील व्यक्तीने आत्महत्या केल्याने आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यावर आरोप झाल्याने सोलापूर जिल्हयात खळबळ उडाली होती. 


मयत उप कार्यकारी अभियंता विकास पानसरे यांच्या संगणक अभियंता असणाऱ्या पत्नी अनिता पानसरे यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली होती. कार्यकारी अभियंता बालाजी डुमणे आणि अधीक्षक अभियंता धनंजय औंढेकर यांनी त्रास दिल्यामुळेच आपल्या पत्नीने आत्महत्या केल्याचं अनिता पानसरे यांनी विलंबाने दाखल केलेल्या आपल्या फिर्यादीत म्हटले होते. पोलिसांनी या दोन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या विरोधात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात झाली. 


या खटल्यात सरकार पक्षाचा पुरावा विश्वासार्ह नाही आणि फिर्याद देण्यास अक्षम्य विलंब झाला आहे त्यामुळे सरकार पक्षाच्या पुराव्यावर विश्वास ठेवणे योग्य होणार नाही असा बचाव आरोपीतर्फे करण्यात आला आणि तो ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्हीही वरिष्ठ अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात आरोपी कार्यकारी अभियंता रामराव डुमणे यांच्या वतीने प्रख्यात विधिज्ञ ऍड.  धनंजय माने , ऍड. जयदीप माने, ऍड, विकास मोटे यांनी काम पहिले तर अधीक्षक अभियंता धनंजय औंढेकर यांच्या वतिने ऍड. वामनराव कुलकर्णी, ऍड. पंकज कुलकर्णी, ऍड. प्रसाद संकल यांनी काम पहिले. सरकार पक्षाच्या वतीने ऍड नागनाथ गुंडे यांनी काम पहिले.     


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !