औरंगाबाद : ऊस घेवून जाणारा ट्रक आणि टेंपो यांच्यात झाल्याले भीषण अपघातात सोलापूरच्या दोन तरुणासह तिघे ठार ( Three dead) झाले आहेत. मृत झालेल्या तरुणात दोन अभियंते आहेत.
अलीकडे रोज अनेक अपघात घडू लागले असून चकाचक केलेले रस्ते हा एक शाप ठरू लागला आहे. रोज अनेक अपघात होत असून कित्येकांचे प्राण रोजच जाऊ लागले आहेत. (Accident rate increased) जगण्यापेक्षा मरण स्वस्त झाले असून अपघाताची घटना एका सामान्य होऊन बसू लागली आहे. कालच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे झालेल्या अपघातात पंढरपूर तालुक्यातील तीन तरुणांचा प्राण गेल्याची दुर्दैवी घटना घडली असताना या अपघातात पुन्हा सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.
गंगापूर- वैजापूर रस्त्यावर उसाचा ट्रक आणि टेंपो यांच्या झालेल्या भीषण अपघातात तीन तरुण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या तीन मृतात दोघे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. सोलापूर जिल्ह्यातील रोहित अरविंद सुरवसे आणि आकाश क्षीरसागर या दोघांसह गणेश पप्पू शिरसाठ (आष्टी, जि. बीड ) या तिघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. वैजापूरच्या दिशेने ट्रक ऊस घेवून निघाला होता तर वैजापूरकडून गंगापूरकडे पिकअप टेम्पो निघाला होता. या दोन वाहनात भीषण अपघात झाला आणि तिघांचा मृत्यू झाला. टेंपोमधून चार जण प्रवास करीत होते, अपघातात त्यांना जबर मार लागला होता त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात पोहोचविण्यात आले परंतु यातील तिघांचा आधीच मृत्यू झाल्याचे समोर आले. शिवशंकर संघवी या जखमीवर उपचार सुरु आहेत.
दोघे अभियंता !
अपघात झालेल्या मार्गावर बोगद्याचे काम सुरु आहे परंतु सुट्टी असल्याने सदर चौघे कंपनीचा टेंपो घेवून शिर्डीला गेले होते. दर्शन करून ते परत येत असताना त्यांच्या टेंपोला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांपैकी सोलापूरचा आकाश क्षीरसागर आणि गणेश शिरसाठ हे दोघे इंजिनियर होते. अपघात होताच ट्रकचा चालक तेथून पळून गेला आहे. उसाचा ट्रक या अपघातात पलटी झाला असून उस रस्त्यावर विखुरला गेला आणि यामुळे बराच काळ रस्त्यावरील वाहतूक बंद पडली होती. अपघातात टेंपोचा झालेला चुराडा पाहून अपघाताची तीव्रता लक्षात येत आहे.
शहरात जातो म्हणाले आणि --
सुट्टीच्या निमित्ताने कंपनीचे काम बंद होते त्यामुळे कामावरील चौघे जण औरंगाबाद शहरात जाऊन येतो असे कंपनीला सांगून गेले. जाताना त्यांनी कंपनीचा टेंपो नेला परंतु शहरात न जाता ते थेट शिर्डीला गेले आणि देवदर्शन करून परत येताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. ( Big accident three dead including Soalpur two young man) या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होऊ लागली आहे.
हे वाचा :
अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !