BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ सप्टें, २०२२

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पकडले बहुढंगी चोर !


 शोध न्यूज : सांगोला पोलिसांनी विविध गुन्ह्यातील सात जणांच्या मुसक्या आवळत सव्हीस लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले असून विविध प्रकरच्या चोऱ्या उघडकीस आल्या आहेत.


सांगोला शहर आणि तालुक्यात विविध प्रकारच्या चोरीच्या घटना वाढत होत्या. चोर चोरी करून जात होते आणि पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे चोरांचे मनोबल वाढलेले दिसत होते. या चोरांना वठणीवर आणण्यासाठी आणि चोरींच्या घटनावर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु होते. जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस कामाला लागले आणि त्यांनी मोठी कामगिरी यशस्वी देखील केली आहे. चोरीला गेलेले तीन अशोक लेलंड टेम्पो, पाच दुचाकी, वेल्डिंग मशीन, केबल, पाणबुडी मोटार असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. 


उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी काही पथके तयार करण्यात आली होती. ही पथके अज्ञात चोरांच्या मागावर होती, सर्व मार्गाने चोरांची माहिती मिळवत असताना त्यांच्या हाती काही गोपनीय माहिती आली आणि त्यानुसार त्यांनी पुढील तपास सुरु केला. यात महेश सुरेश वाघमारे (वय 22 वर्षे, रा. भोकरेवस्ती सांगोला), बिरुदेव ऊर्फ बिऱ्या दादासो ऐवळे (रा. फॅबटेक कॉलेजच्या पाठीमागे पंढरपूर रोड सांगोला), स्वप्निल बापु ऐवळे (वय 26 वर्षे दोघे रा. वासुद, ता. सांगोला), गणेश भिमराव शिंदे (वय 24 वर्षे, रा. मस्के कॉलनी, सांगोला), खंडू नामदेव चव्हाण (वय 22 वर्षे, रा. मणेरी गल्ली, सांगोला), अतुल श्रीकांत चंदनशिवे (वय 30 वर्षे, रा. वासुद ता. सांगोला), सचिन बाळासाहेब दिघे (वय 30 वर्षे) यांना ताब्यात घेतले आणि गुन्ह्याच्या संदर्भात चौकशी सुरु केली. 


पोलिसांच्या या चौकशीत अशोक लेलँड कंपनीचे तीन लहान टेम्पो, पाच दुचाकी, साडे तीन टन वजनाचे स्टील, केबल, वायर, ग्राइंडर कटर, पाणबुडी मोटार, वेल्डिंग मशीन आदी २५ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  (
Solapur rural police revealed many thieves) सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले, सहाय्यक पोलीस फौजदार कल्याण ढवणे, पोलीस हवालदार सचिन वाघ, अस्लम काझी, नाईक अनिल निंबाळकर, पोलीस कर्मचारी गणेश झाडबुके, पैगंबर मुलाणी,अमर पाटील यांच्यासह  सायबर विभागातील अन्वर अत्तार यांनी परिश्रम घेतले. सांगोला पोलिसांनी ही मोठी कामगिरी केल्याने नागरीकातून समाधान व्यक्त होत असतानाच गुन्हेगारांना मात्र मोठा धक्का बसला आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !